विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
परभणी/सोनपेठ (दर्शन):-
महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या अर्थात विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवारी (दि.2) परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.राजेश विटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.अजित पवार यांच्यासह कृषी मंत्री धनंजय मुंडे, परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
पक्षाच्या वरिष्ठांनी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मन: पूर्वक आभारी आहे. विधान परिषद सभागृहात निवडून येत राज्याच्या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत योगदान देण्याची आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तडीस नेण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया श्री.राजेश विटेकर यांनी दिली आहे.
-------------------------------------------------
संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधावा मो.9823547752........
-------------------------------------------------

No comments:
Post a Comment