Monday, June 17, 2024

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बैठकीत शैक्षणिक किटचे वाटप,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची फेरनियुक्ती तर वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मारोती जुंबडे


व्हॉईस ऑफ मीडियाच्या बैठकीत शैक्षणिक किटचे वाटप,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची फेरनियुक्ती तर वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मारोती जुंबडे

परभणी/सोनपेठ (दर्शन) : - 




व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हा आढावा बैठक परभणी शहरात सोमवार, दि.१७ जून रोजी पार पडली. या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तसेच आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी मारोती जुंबडे यांची निवड करण्यात आली. यावेळी गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.


व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची आढावा बैठक मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनेच्या मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती देण्यात आली. पत्रकारांच्या आरोग्याच्या सेवेसाठी वैद्यकीय कक्ष स्थापन केला असून वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मारोती जुंबडे यांची या बैठकीत निवड करण्यात आली. लवकरच या कक्षाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांच्या आरोग्य बाबत माहिती संकलित करून त्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले जाणार आहे. त्यासोबतच परभणी मेडिकल कॉलेज यांचे देखील ओळखपत्र दिले जाणार असून त्या माध्यमातून सवलतीच्या दारामध्ये परभणी मेडिकल कॉलेज येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाभरातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य असलेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जाणार असून यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांची सर्व माहिती संकलित करून गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शिकवणी शुल्कामध्ये मदत केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्य व इतर समस्या संदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया कडून मदत दिली जाणार आहे अशी माहिती या बैठकीत चोरडिया यांनी दिली.
आगामी काळात पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटी निर्मितीवर भर दिला जाणार आहे. तसेच जुलै महिन्यामध्ये जिल्हास्तरीय व्हॉईस ऑफ मीडियाचा मेळावा घेऊन या मेळाव्यात आरोग्य विमा कार्ड वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया शैक्षणिक समितीच्या वतीने १५ गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

गजानन देशमुख यांची फेरनियुक्ती


व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र मराठवाडाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आले. लवकरच संघटनेची पुनर्बांधणी बांधणी केली जाणार असून तालुका व जिल्हास्तरीय नवीन कार्यकारणीत नवीन चहेऱ्यांना संधी दिली जाणार आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला मुख्य मार्गदर्शक सुरेश जंपनगीरे, मराठवाडा कार्यकारणी उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, सचिव श्रीकांत देशमुख, उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे, मंचक देशमुख, सय्यद युसुफ, विजय कुलकर्णी, बालासाहेब काळे, माणिक रासवे, प्रदीप कांबळे, गणेश लोखंडे, भागवत चव्हाण, लक्ष्मण कच्छवे, नरहरी चौधरी, संतोष गवळी, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा, जिल्हा उपाध्यक्ष किरण स्वामी, कल्याण वाघमारे, प्रदीप गोरशेटे, शिवकिरण शिंदे, दिलीप माघाडे, माबुद खान, किशन इक्कर आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment