शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महंत नेहरू महाराजांच्या हस्ते संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बंजारा समाजाचे महंत श्री नेहरू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
सोनपेठ शहरातील गणेश नगर भागात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पाथरी विधानसभा प्रमुख डॉ. राम शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपने, काँग्रेस तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पायघन, गंगाखेड येथील साधना ताई राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री.क्षेत्र पोहरादेवीचे महंत नेहरु महाराज पोहरादेवीकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सोनपेठ महाविकास आघाडीच्या वतीने महंत नेहरू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंजभाऊ धोंडगे, डॉ राम शिंदे तसेच महंत नेहरू महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करून लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्ते तसेच जनतेला केले.
या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोनपेठ येथील असंख्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment