Saturday, September 30, 2023

सोनपेठ शहरात श्री सोमेश्वर गणेश मंडळ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक तृतीय

सोनपेठ शहरात श्री सोमेश्वर गणेश मंडळ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक तृतीय

श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ  (प्रथम)
श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ (द्वितीय).
श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक सोनपेठ (तृतीय).


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील सर्व परवाना धारक श्री गणेश मंडळ स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणूक पर्यंत विविध निकषाद्वारे प्रथमच सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या माध्यमातून निवड समितीतील रोटरीयन इंजि.चंद्रकांत लोमटे, नागनाथ सातभाई, संजय आढे, लिंबाजी कागदे व रामेश्वर कदम आदिंच्या मार्गदर्शनात परीक्षणानुसार श्री सोमेश्वर गणेश मंडळ श्री सोमेश्वर नगर दहिखेड सोनपेठ प्रथम, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ द्वितीय तर श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक सोनपेठ तृतीय असे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत,प्रथमच सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या माध्यमातून शहरातील सर्व परवाना धारक श्री गणेश मंडळ सोनपेठ प्रत्येकाला भेट देऊन तसेच विसर्जन मिरवणूक पाहुण हे पुरस्कार जाहीर केले आहेत, लवकरात लवकर या श्री सोमेश्वर गणेश मंडळ पदाधिकारी, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर पदाधिकारी तसेच श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक पदाधिकारी यांना निमंत्रित करून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, पुरस्कार स्वरुपात सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या वतीने आकर्षक प्रमाण पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या शहरातील श्री सोमेश्वर गणेश मंडळ पदाधिकारी, श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर पदाधिकारी तसेच श्री मोरया गणेश मंडळ गरुड चौक पदाधिकारी यासर्वांचे सॅटेलाईट रोटरी क्लब ऑफ सोनपेठ सिटी अध्यक्ष, सचिव व सर्व रोटरीयन बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शहरातुन सर्व स्तरातून तिन्ही श्री गणेश मंडळांचे अभिनंदन होताना दिसत आहे.

Friday, September 29, 2023

स्वच्छतेसह श्रमदान’ उपक्रम रविवारी नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

‘स्वच्छतेसह श्रमदान’ उपक्रम रविवारी नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून, रविवार, (दि. १) रोजी सकाळी १० वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  केले आहे.
देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे.  स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले आहे.  

Wednesday, September 20, 2023

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

K. G पासून ते P. G पर्यंत शिक्षणाची गंगा खळखळवनारे ह.शि.प्र.मं.अध्यक्ष शिवश्री मा.परमेश्वरराव कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच! सोनपेठ शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित कदम घराण्यातील दुसऱ्या पिढीतील उभारतं व्यक्तिमत्व म्हणजे श्री परमेश्वर राजभाऊ कदम! माजी आमदार मा. व्यंकटराव कदम साहेब, सोनपेठ न.प.चे माजी उप-नगराध्यक्ष मा.दत्तराव कदम काका या दोन जेष्ठ कदम घराण्यातील धुरीणांच्या मार्गदर्शनात आणि वडील, माजी नगरसेवक कै.राजाभाऊ कदम साहेबांचा वारसा लाभलेले श्री परमेश्वर कदम यांनी मागील 15 वर्षात आपल्या संस्थेच्या अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे! विशेषत: वरिष्ठ महाविद्यालयाने NAAC यशस्वीपणे सामोरे जाऊन B दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणपत्र मिळवण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे!  श्री परमेश्वर कदम साहेबांनी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा हाती घेतल्यापासून संस्थेने कात टाकली असून संस्थेने KG ते PG अशी यशस्वी, दैदिप्यमान वाटचाल केली असून या संस्थेअंतर्गत जवळपास तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आजघडीला ज्ञानार्जन करत आहेत आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचारी अध्ययन-अध्यापन करत आहेत! अत्यंत कमी वयात खांद्यावर पडलेले संस्थेचे हे शिवधनुष्य श्री परमेश्वर कदम यांनी लीलया पेलले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय दमदारपणे वाटचाल करत आहे याचा मनस्वी अभिमान वाटतो! स्व.राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या रोपट्याला योग्य सिंचन करून या संस्थेचे छान संगोपन त्यांच्याकडून होत आहे! या संस्थेच्या माध्यमातून सोनपेठ सारख्या दुर्गम, शिक्षणापासून वंचित भागात खेड्यापाड्यात,  वाडी-तांड्यावर विशेषतः मुलींसाठी उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघर जाऊन पोहोचली आहे, त्याद्वारे *ज्ञानात धर्म तत् सुखम* हे संस्थेचे ब्रीद सार्थ ठरते आहे ! संस्थेच्या खांद्याला खांदा लावून वरिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ, उच्च-विद्याभूषित, अनुभवी प्राचार्य-प्राध्यापक मंडळींच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळेतील शिक्षक इथे एकनिष्ठ भावनेने काम करत असून या सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन श्री कदम साहेब हे सर्वांना सोबत घेऊन संस्थेची ही नाव मोठ्या सन्मानाने पुढे नेत आहेत! याचाच परिपाक म्हणजे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी NET/SET/PhD सारख्या परीक्षा/पदव्या संपादन करत असून अनेक विद्यार्थी प्राचार्य-प्राध्यापक-शिक्षक-CA-बँकेत अधिकारी आदी सन्मानीय पदावर रुजू झाले आहेत! मागील काही वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी NEET/JEE/MH-CET आणि इतर परीक्षेच्या माध्यमातून MBBS/BAMS/BHMS/Pharmacy/Engineering सारख्या सन्मानाच्या कोर्सेसला प्रवेश नोंदवून संस्थेच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे खोवले आहेत! नक्कीच ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे! तेंव्हा, आज मा.अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व शिक्षक-प्राध्यापक सोनपेठ पंचक्रोशीतील तमाम नागरिक-पालक यांना अभिवचन देतो की, आपण आपला पाल्य (मुलगा-मुलगी) बिनधास्त आमच्या कॅम्पस मध्ये शिक्षणासाठी प्रवेशित करा! त्याला आम्ही मनोभावे मार्गदर्शन करू, त्याबरोबरच आपणही आपल्या पाल्याचे दप्तर, नोटबुक आणि इतर गोष्टी तपासून त्याला अभ्यास करण्यास प्रवृत्त करून आमच्या ज्ञानार्जनाचे सार्थक करावे ही माफक अपेक्षा! तसेच, आम्ही इथे याहीपेक्षा जोमाने ज्ञानदानाचे काम करत राहू ही ग्वाही देतो आणि संस्था अध्यक्ष मा.श्री परमेश्वर कदम साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन तूर्तास हा शब्दप्रपंच इथे थांबवतो ! 
जय हिंद! जय भारत !
प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये सर यांच्या लेखणीतून...

Monday, September 18, 2023

कै.र.व.महाविद्यालयाचा जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शिवमल्हार वाघे यांची हॅट्रिक.....

कै.र.व.महाविद्यालयाचा जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शिवमल्हार वाघे यांची हॅट्रिक.....


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश शिवमल्हार वाघे याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे .क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, परभणी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील कल्याण मंडप येथे शनिवार दि. 15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथमेश वाघे याने विजयाची हॅट्रिक करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, सन 2019 ,22 23 मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करून तीन वेळा विजय प्राप्त केला आहे ,यापूर्वी सलग चार वेळा तालुकास्तरीय स्पर्धेत विजेता ठरला आहे.सोनपेठ तालुक्यातील कानाकोपऱ्यात बुद्धिबळ खेळाचे खेळाडू निर्माण करण्याचा त्याचा मानस असून तो असंख्य विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देत आहे, त्याच्या यशाबद्दल जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष प्रशिक्षक संभाजी बिल्पे, अंकुशराव चट्टे,  प्रशिक्षक चंद्रशेखर पोटेकर, कमलनयन देशमुख, अभिजीत बिल्पे, नांदेड येथील प्रशिक्षक प्रा.डॉ.दिनकर हंबर्डे, ह.शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य शेख शकीला, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी तळेकर, क्रीडा शिक्षक प्रा.कैलास आरबाड, प्रा.गोविंद वाकणकर, मंगेश तांबट,आकाश रोकडे,उमेश मुळे, मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या सर्व सदस्यांनी व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Sunday, September 17, 2023

पोहंडूळ जिल्हा परिषद शाळेत राजेश विटेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप

पोहंडूळ जिल्हा परिषद शाळेत राजेश विटेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप


सोनपेठ (दर्शन) :-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष 2023 विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहंडुळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहंडुळ येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 निमित्य व तालुकास्तरीय विज्ञान नाट्यउत्सव या उपक्रमांतर्गत शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या नाटिकेचे सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या क्रमांकासाठीचे बक्षीसे गावातील पालक मा.श्री.माऊली बळीराम कानडे आणि मा.श्री.मुंजाभाऊ विठ्ठल जगतकर यांच्या तर्फे देण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.राजेश दादा विटेकर (मा.जि.प.अध्यक्ष),मा.श्री.दशरथराव सूर्यवंशी पाटील (सभापती कृ.उ.बा.स.सो.),मा.श्री.उत्तमराव जाधव (उपसभापती कृ.उ.बा.स.सो.),मा.बालाजी जोगदंड (संचालक कृ.उ.बा.स.सो.),मा.श्री.रामेश्वर मोकाशे (संचालक कृ.उ.बा.स.सो.) गावच्या सरपंचा सौ.संगिताई कापसे,शा.व्य.स.अध्यक्ष मा.श्री.गजानन कापसे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप करण्यात आली, यावेळी शाळेचे उ.श्रे.मु.अ.श्री.आश्रोबा सावंत, शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील नागरिक, पालक उपस्थित होते.

Tuesday, September 12, 2023

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे

सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा - सपोनि.सुनिल अंधारे



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरात पोलीस स्टेशन येथे दिनांक 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता विविध सण उत्सव पोळा, मराठवाडा मुक्ती संग्राम, श्री गणेश चतुर्थी, जेष्ठागौरी आवाहन, अनंत चतुर्दशी व ईद- ए- मिलाद आदि सन उत्सवा निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार माननीय सुनील कावरखे तर प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे, पीएसआय फड व म्हात्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती,याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सपोनी सुनील अंधारे यांनी बोलताना सांगितले की सोनपेठ तालुक्यात श्री गणेश उत्सव डी.जे. मुक्त व्हावा असे आवाहन त्यांनी केले, तसेच श्री गणेश उत्सव पट्टी वसुली समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार करावी,डी.जे.च्या खर्चा ऐवजी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शाळेला आवश्यक गोष्टी भेट स्वरूपात मदत करावी, विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात यावे, रक्तदान, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, सामाजिक संघटना, मित्र मंडळ आदिंनी मिरवणुकी दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी सुचना देण्यात आल्या, यावेळी मनोगत जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सिरसाट, जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार परिषद जिल्हा उपाध्यक्ष शिवमल्हार वाघे, अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे सचिव आश्रोबा खरात आदिंनी व्यक्त करत, नगर परिषद साठी सुचना प्रमुख मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्य उचलून रस्ते मोकळे करावेत, रस्त्यावरील आडव्या नाल्याचे मध्यभागी उघडे असलेल्या खड्ड्यावर झाकण बसवावेत, प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांचे साहित्य उचलून कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत,वाहन धारकांना शिस्त लावावी, विद्युत महावितरण कंपनीने प्रमुख मिरवणूक मार्गावर लोंबकळत असलेल्या तारांना बांबू लावावेत, श्री गणेश भक्तांसाठी शहरातील मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने पारितोषिक वितरण करावे, निवड समिती मध्ये शांतता समितीचा एक सदस्य, पत्रकार प्रतिनिधी एक, प्रशासकीय महसूल अधिकारी एक, आरोग्य अधिकारी एक व वकील संघाचा एक प्रतिनिधी असावा, अध्यक्षीय समारोप तहसीलदार सुनील कावरखे यांनी केला तर आभार सपोनि सुनील अंधारे यांनी मानले.यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, पत्रकार बांधव, शहरातील व ग्रामीण विविध श्री गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.