भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची नियुक्ती ; महानगर अध्यक्षपदी राजेश देशमुख
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष त्रिंबकराव मुरकुटे तर परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी रात्री राज्यातील काही जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या.त्यात परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य मुरकुटे तर परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.सुभाष कदम यांच्या फेरनिवडीसह अन्य काही नावांचा बोलबाला सुरू होता.तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रमोद वाकोडकर, मधुकर गव्हाणे, संजय शेळके यांच्या नावा संदर्भात चर्चा सुरू होती.परंतू पक्ष श्रेष्ठीनी या दोघांची नावे जाहिर केली.यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.
संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो.9823547752.

No comments:
Post a Comment