सोनपेठ तालुका प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी शिवमल्हार वाघे तर संघटकपदी डॉ.बालाजी पारसेवार
सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे यांना नियुक्ती पत्र जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार राधेश्याम वर्मा यांच्या हस्ते दिऊन यांची नियुक्ती करण्यात आली तर संघटकपदी डॉ.बालाजी पारसेवार यांना जिल्हाध्यक्ष के.डी. वर्मा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन
यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
संघटनेचे राज्याध्यक्ष रणजीत श्रीगौड यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष के.डी. वर्मा यांनी शनिवार दि. 8 जुलै रोजी नियुक्तीचे पत्र दिले आहे, प्रवाशांच्या हक्कासाठी संघटनेचे राज्यभर कार्य सुरू आहे, तालुका कार्यकारणी दोन वर्षासाठी असून तालुका संघटनेची उर्वरित कार्यकारणी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे के.डी.वर्मा यांनी सांगीतले.
याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान मूल्यांकन समितीच्या सदस्य पदी के.डी. वर्मा यांची नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. डॉ. बालाजी पारसेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार राधेश्याम वर्मा, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष सुभाष सुरवसे, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. बापुराव आंधळे, पंकज वर्मा आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment