Friday, July 28, 2023

रामेश्वर ज्वेलर्स या दुकानाच्या शटर सायरन मुळे परळीचे दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद

रामेश्वर ज्वेलर्स या दुकानाच्या शटर सायरन मुळे परळीचे दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद

रामेश्वर ज्वेलर्स, श्री बालाजी मंदिर जवळ सोनपेठ.

एअरटेल कंपनीचा शटर सायरण.


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील श्री बालाजी मंदिर जवळ रामेश्वर मधुकर टाक व रवी मधुकर टाक यांचे रामेश्वर ज्वेलर्स दुकान आहे,दिनांक 28 जुलै 2023 पहाटे 2:45 वाजता परळी येथील अट्टल दरोडेखोर तिघे जण टाबीने शटर उचकून चोरी करण्याच्या प्रयत्नात होते तेवढ्यात शटरला बसवलेला एअरटेल कंपनीचा शटर सायरन मोठ्याने वाजत राहिला तिघे जण घाबरून सैरावैरा सामान घेऊन पळून जाण्याच्या बेतात होते तसेच रामेश्वर टाक व रवी टाक यांच्या मोबाईल ला सदरचा शटर सायरन अटॅच असल्याने मोबाईल सायरण ही वाजू लागले की दोन्ही भाऊ उठून प्रथम दुकानाकडे शारदा नगर येथील निवासस्थानाकडून निघाली परंतु मनात विचार आला चोर किती असतील आपण पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना घेऊन येऊ म्हणून फिरले तर पेट्रोलिंग करत असलेली जीप माजलगाव वैशीत उभी होती म्हणून तिघे जण मोटर सायकलवर मटन मार्केट मधून काबरा मार्केटला निघालेले या पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी तात्काळ काबरा मार्केट जवळ उभी असलेल्या पोलिसांना ही माहिती दिली तर मोटर सायकल पोलीस पाहताच गरबडीत दोघे उडी मारून परळी रोडने निसटले तर एक जण मोटर सायकलसह जेरबंद केला लगेच त्याला कुठलचे रे तुम्ही विचारले असता त्यांनी परळीचे असे सांगतात पीएसआय अमर केंद्रे व सोबत पीएसआय म्हात्रे, पोलीस नाईक मुंडे , कुलकर्णी आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस व्हॅनमध्ये तात्काळ परळी रोड कडे निघाले खपाट पिंपरी पाटी जवळ दोघेजण पुन्हा एका मोटर सायकलवर पळून जात असताना दिसले पोलीसांनी व्हॅनने त्यांना पाठीमागून टक्कर देत थांबवली, त्यामध्ये पुन्हा एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला तरी पोलिसांनी त्याचा शेतातून चिखलात दहा किलोमीटर पाठलाग केला,त्या एकाला मोटर सायकलसह घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला हजर केले.हि मोटार सायकल कुनाची विचारले तर बायपास रोड वरची उचलली असे सांगितले, अधिकचा तपास सपोनी सुनील अंधारे करीत असून परळीचे हे अट्टल दरोडेखोर रोहित बाळासाहेब सावळे, रोहन भागवत डेंगळे जेरबंद असुन तिसरा मंगल शिकलकरी वस्ती फरार यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 कलम 457, 380 व 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिघापैकी दोघांना तात्काळ जेरबंद केल्या बद्दल सोनपेठ पोलीस अधिकारी सपोनि सुनील अंधारे, पीएसआय अमर केंद्रे, पीएसआय म्हात्रे, पोलीस नायक मुंडे व कुलकर्णी आदी पोलीस कर्मचारी यांचे सर्व व्यापारी वर्गातून कौतुक व अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------------
आपली बातमी व जाहिराती साठी संपर्क 9823547752.संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन......
-------------------------------------------------------------

Friday, July 21, 2023

परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची नियुक्ती थोडक्यात परिचय

परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची नियुक्ती थोडक्यात परिचय


मुंबई/औरंगाबाद/परभणी/सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून आर.के.गावडे यांची नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंचल गोयल यांना जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
परभणीचे नूतन जिल्हाधिकारी आर.के.गावडे हे पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील रहिवासी आहेत.त्यांचे संपूर्ण नाव रघुनाथ खंडू गावडे असे असून त्यांना  2020 मध्ये आयएएस केडर मिळाले आहे. श्री.गावडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. त्यानंतर महसूल विभागात त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती, शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा (जि.नंदुरबार) येथे करण्यात आली. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.
सन 2001 मध्ये त्यांची नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी पदावर नेमणूक झाली. या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या विविध दौऱ्यांसमयी ओझर विमानतळ येथे राजशिष्टाचार व त्या संबंधातील कामे त्यांनी चोखपणे पार पाडली. 2006 ते 2010 या कालावधीत त्यांनी नाशिक विभागात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव या अतिशय संवेदनशील व महत्वाच्या पदावर काम केले. महाराष्ट्र शासनाने सन 2014 साली नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी मेळा अधिकारी पदावर नियुक्ती केली. 2014 ते 2016 या कालावधीतील हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. या उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिका देशात देखील घेतली गेली. या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. 2017-2020 या कालावधीत त्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर काम केले. या संपूर्ण सेवाकाळातील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची 2020 मध्ये आयएएस पदी पदोन्नती केली आहे. एक शिस्तप्रिय व धडाडीचा सनदी अधिकारी म्हणून श्री.रघुनाथ गावडे यांची ओळख आहे.


Wednesday, July 19, 2023

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची नियुक्ती ; महानगर अध्यक्षपदी राजेश देशमुख

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची नियुक्ती ; महानगर अध्यक्षपदी राजेश देशमुख 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष त्रिंबकराव मुरकुटे तर परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी रात्री राज्यातील काही जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या.त्यात परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य मुरकुटे तर परभणी महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब  करण्यात आले आहे.ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.सुभाष कदम यांच्या फेरनिवडीसह अन्य काही नावांचा बोलबाला सुरू होता.तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रमोद वाकोडकर, मधुकर गव्हाणे, संजय शेळके यांच्या नावा संदर्भात चर्चा सुरू होती.परंतू पक्ष श्रेष्ठीनी या दोघांची नावे जाहिर केली.यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो.9823547752.

Friday, July 14, 2023

खंडाळा जिल्हा परिषद शाळेची यशाची परंपरा कायम

खंडाळा जिल्हा परिषद शाळेची यशाची परंपरा कायम


पुर्णा / सोनपेठ (दर्शन) :-

पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथील विद्यार्थ्यांनी कुमारी सारिका शिवराम शिंदे हिने परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला
खडाळा येथील शाळेची गतवर्षीपासून यशाची घोडदौड कायम आहे गतवर्षी नवोदय प्रवेशित. एक शिष्यवृत्तीधारक झाला होता तर यावर्षी एक नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी. आणि सारिका शिवराम शिंदे ही विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक झालेली असून पूर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. सिद्धार्थ मस्के आणि  मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील पदवीधर शिक्षक व्यंकटराव जाधव,पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे, प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर साखरे पांडुरंग मोरे, राहुल काउतकर प्रल्हाद राठोड, वर्षा पाटील आदींचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे शिवराम शिंदे यांनी यशाचे श्रेय सर्व शिक्षकांना दिले आहे.

Sunday, July 9, 2023

सोनपेठ तालुका प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी शिवमल्हार वाघे तर संघटकपदी डॉ.बालाजी पारसेवार

सोनपेठ तालुका प्रवासी महासंघाच्या अध्यक्षपदी शिवमल्हार वाघे तर संघटकपदी डॉ.बालाजी पारसेवार



सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे यांना नियुक्ती पत्र जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार राधेश्याम वर्मा यांच्या हस्ते दिऊन यांची नियुक्ती करण्यात आली तर संघटकपदी डॉ.बालाजी पारसेवार यांना जिल्हाध्यक्ष के.डी. वर्मा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन 
यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
संघटनेचे राज्याध्यक्ष रणजीत श्रीगौड यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष के.डी. वर्मा यांनी शनिवार दि. 8 जुलै रोजी नियुक्तीचे पत्र दिले आहे, प्रवाशांच्या हक्कासाठी संघटनेचे राज्यभर कार्य सुरू आहे, तालुका कार्यकारणी दोन वर्षासाठी असून तालुका संघटनेची उर्वरित कार्यकारणी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे के.डी.वर्मा यांनी सांगीतले.
 याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान मूल्यांकन समितीच्या सदस्य पदी के.डी. वर्मा यांची नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. डॉ. बालाजी पारसेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार राधेश्याम वर्मा, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष सुभाष सुरवसे, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. बापुराव आंधळे, पंकज वर्मा आदी उपस्थित होते.

Saturday, July 1, 2023

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे एनटीसी धनगर संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढीव 50 जागेवर अर्ज करावेत - श्रीमती गीता गुट्टे

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे एनटीसी धनगर संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढीव 50 जागेवर अर्ज करावेत - श्रीमती गीता गुट्टे


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ जिल्हा परभणी येथील जिजामाता पब्लिक स्कूल अँड जू कॉलेज येथे नव्याने वाढीव 50 जागेवर एन टी - सी धनगर संवर्गातील विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करण्यात यावेत.
शासनाच्या आदिवासीच्या वस्तीगृहाच्या धरतीवर चालू असलेल्या एनटीसी धनगर संवर्गातील विद्यार्थ्यांचे सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्गामध्ये वाढीव 50 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परवानगी शासनाने दिलेली असून सदरील शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,जायकवाडी वसाहत,परभणी या पत्त्यावर किंवा स्वतः कार्यालयात पोहोचती करावेत असे आवाहन श्रीमती गीता गुट्टे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांनी केले असून सोबत खालील कागदपत्रांची सत्यप्रत (झोरॉक्स) जोडण्यात यावी, 1) अर्ज, 2) टी. सी./ जन्मदाखला, 3) जातीचे प्रमाणपत्र, 4) उत्पनाचे प्रमाणपत्र (2022-23), 5) आधार कार्ड (विद्यार्थी), 6) आधार कार्ड ( पालक) आदीं कागदपत्रे सादर करावीत.