महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यीनींना सायकलचे वाटप ; विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून उज्वल भविष्य घडवावे- शौकत पठाण
सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात दि.०६ मे २०२३ शनिवार रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष पुर्तता दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास अभियानांतर्गत विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींना शाळेला येण्या-जाण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १३० सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शौकत पठाण उपशिक्षणाधिकारी(प्रा.) परभणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अनिल घनसावंत, प्रमुख उपस्थिती संस्था सचिव सुभाषअप्पा नित्रुडकर, बसलिंगअप्पा मोडीवाले, उमाकांतअप्पा कोल्हेकर, दत्तराव मस्के आंदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व सरस्वती देवी प्रतीमा पुजनाने झाली.
यावेळी बोलताना नायब तहसीलदार घनसावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले तर उपशिक्षणाधिकारी(प्रा.) शौकत पठाण यांनी सायकलचा वापर करून नियमित शाळेत येण्याचे व कठीण परीश्रम घेवून उज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. त्यानंतर शै.वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येवून प्रगती पुस्तकाचे वाटप करण्यात आले.शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानव विकास योजने अंतर्गत पात्र विद्यार्थीनिंना सायकलचे वाटप करण्यात आले.लाभ घेणार्या विद्यार्थ्यांनींना बसची प्रतिक्षा करत शाळेला येण्या जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा आणि वेळ पण जायचा त्यामुळे त्यांना मानव विकास योजने अंतर्गत सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये आनंद दिसून आला.यावेळी गावातील पालकांसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सायकल वाटप विभाग प्रमुख सहशिक्षक कालिदास मस्के यांच्यावतीने देण्यात आलेल्या अल्पोपहारानंतर झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक पंढरीनाथ जोशी यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक श्रीकांत परळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक रमाकांत होडगे यांनी केले.
--------------------------------------------------------------------
साप्ताहिक सोनपेठ दर्शन सबसे तेज बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752....
--------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment