परळी वै.पंचक्रोशितील सर्वोच्च "श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023" जाहिर ; मे 2023 मध्ये परळी वै.येथे भव्य दिव्य गौरव सोहळ्याचे आयोजन
परळी / सोनपेठ (दर्शन):- दिवां सेवा संस्थान ,परळी तालूका पत्रकार संघ यांचे विद्यमान किर्तीवंत, यशवंत, नामवंत, प्रतिभावंत, गुणवंत अशा महान रत्न व्यक्तीमत्वास ज्यांचे गत कार्य आदर्श घेण्यासारखे असून त्यांच्या प्रमाणे पुढील पिढी घडावी व एक सुस्क्रुंत समाजप्रिय नागरिक,सामाजिक कार्यकर्ता घडावा या उदात्त हेतूने समाजातील सर्व क्षेत्रातून आमच्या श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार समितीने समाजातील त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन समाजातील विचारवंत, व नागरिकांशी चर्चा करूनसर्वानुमते एकुण 16 रत्न महान व्यक्तींची परळीवै.पंचक्रोशितील सर्वोच्च अशा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 साठी निवड केली आहे,या रत्न व्यक्तींची घोषणा आज करित आहोत.मा.आ.श्री पंडीतराव नारायणरावजी दौंड-माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र, मा.श्री विकासराव रामचंद्रजी डुबे-सामाजिक जेष्ठ नेते परळीवै.,मा.श्रीमती राधाबाई मोहनलालजी बियाणी-धर्म व संस्कार परळीवै.,मा.श्री विष्णूपंत सुभानराव सोळंके-सामाजिक कार्य नागापूर,मा.श्री शिवाजी दादा दत्तोपंत कुलकर्णी-सामाजिक कार्य अंबाजोगाई, मा श्री गणपत अप्पा शंकर अप्पा सौंदळे-जेष्ठ पत्रकार, परळीवै.,मा. श्री.सय्यद हनिफ सय्यद करीम उर्फ बहादूरभाई-सामाजिक कार्य उद्योजक परळीवै.,मा.श्री.वाल्मिकराव बाबुरावजी कराड, निष्ठा व संघटन पांगरी.ता.परळीवै, मा.श्री.संदिप सुभाषरावजी टाक- प्रतिष्ठीत व्यापारी परळीवै.,मा.श्री.गोपालसेठ बन्सिलालजी सोमाणी-धर्म आणी उद्योजक परळी वै., मा. श्री. सुंदरराव पांडूरंगरावजी गित्ते -संरपंच व युवा नेता नंदागौळ. ता.परळीवै., मा.सौ.गोदावरीताई राजारामजी मुंडे- संरपंच व सामाजिक नेत्या टोकवाडी. परळीवै. मा.सौ.सुरेखाताई विजयकुमारजी मेनकुदळे- धर्म आणी संस्कार परळीवै., मा.श्री.बाजीराव प्रकाशरावजी धर्माधिकारी मा.नगराध्यक्ष. युवा नेते परळीवै.,मा.श्री. अनिकेत द्वारकादासजी लोहिया,जलव्यवस्थापन व सामाजिक नेते अंबाजोगाई.जि.बीड, मा.श्री.रमाकांतराव अनंतरावजी जोशी, शिक्षण व्यवस्थापन व कोव्हिड योध्दा लो.सावरगाव परळीवै. या महान गौरवमुर्तींचा गौरव सोहळा, श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 व शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन अनेक मान्यवराच्या शुभहस्ते व उपस्थीतीमध्ये मे 2023 मध्ये परळीवै.येथे भव्य दिव्य करण्यात येणार आहे. पुरस्कार गौरव सोहळा व कुलस्वामिनी दिनदर्शिका2023 -24 ची तयारी अंतीम टप्यात असून लवकरात लवकर सोहळ्याची तारिख घोषित करण्यात येईल.असे आवाहन परळीवै.येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकार दिपक वांजरखेडे मुख्य संयोजक व पत्रकार श्री.बालकिशनजी सोनी अध्यक्ष परळीवै.तालूका पत्रकार संघ परळीवै. व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment