Saturday, May 27, 2023

जिजामाता पब्लिक स्कुल & ज्यू कॉलेजची 100 % निकालाची परंपरा कायम मिसाळ अक्षय तालुक्यात सर्वप्रथम

जिजामाता पब्लिक स्कुल & ज्यू कॉलेजची 100 % निकालाची परंपरा कायम मिसाळ अक्षय तालुक्यात सर्वप्रथम


सोनपेठ (दर्शन) :-

मार्च २०२३ मध्ये झालेल्या १२ वी बोर्ड परिक्षेत सोनपेठ येथिल जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेजने १००%  यशाची परंपरा कायम राखत  सोनपेठ तालुक्यातून  मिसाळ अक्षय बाळासाहेब या विद्यार्थ्यांने ९४.६७ % गुण मिळवत सोनपेठ तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश  संपादन केले आहे .विज्ञानशाखेत एकून २० विद्यार्थांनी परिक्षा दिली पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शालेचा निकाल १०० % लागला आहे .१२ वी च्या ३ बँच बाहेर पडल्या असून मागिल ३ बँच चा निकाल १००% ची परंपरा १० वी प्रमाने कायम राखली आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. प्रा. मुंजाभाऊ धोंडगे,प्राचार्य अजय ए जे ,प्रा गणेश जयतपाळ व सर्व शिक्षक वृंद यांनी केले आहे .
(संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो.9823547752.)

Tuesday, May 9, 2023

पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन

पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

दि.10 : पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाभरात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा,असे अवाहन व्हॉईस ऑफ मीडियाकडून करण्यात येत आहे.
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते.मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या सरकारकडे करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 1) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. 2) पत्रकारितेत 5 वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. 3) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. 4) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. 5) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. 6) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. 
या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयसमोर गुरूवारी (दि.11 मे) सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत धरणे आंदोलन करणार आहे. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा,असे अवाहन व्हॉईस ऑफ मीडियाकडून करण्यात येत आहे.

Monday, May 8, 2023

सोनपेठ पोस्ट ऑफिस आर्थिक व्यवहार ठप्प ; बीएसएनएल च्या अवकृपेने इंटरनेट सेवा बंद दुरसंचार मंत्री लक्ष द्या....

सोनपेठ पोस्ट ऑफिस आर्थिक व्यवहार ठप्प ; बीएसएनएल च्या अवकृपेने इंटरनेट सेवा बंद दुरसंचार मंत्री लक्ष द्या....



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ पोस्ट ऑफिस मधील बँकिंग आर्थिक व्यवहार गेल्या पंधरा दिवसापासून ठप्प झाल्याने अनेक बचत  खातेदारांची मोठी अडचण निर्माण झाली तसेच बि.एस.एन.एल.मोबाईल सेवा हि विस्कळीत झाली असून इंटरनेट सेवा बंदला सोनपेठ येथील बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सोनपेठ शहरासह जवळपासच्या ग्रामीण भागाचा कारभार चालणारे सोनपेठचे मुख्य पोस्ट ऑफिस आहे यातून बचत खाते, आवर्ती ठेव खाते, सुकन्या योजना असोवा दामदुप्पट योजना सह अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहार पोस्टाच्या बँक व्यवहारातून होतो परंतु काही कारणामुळे संगणक सेवेसाठी आवश्यक असलेला इंटरनेट बंद असल्याने गेल्या पंधरा दिवसापासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले,
दररोज शहरातील असो वा ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक खातेदार पोस्ट मध्ये येऊन चक्करा मारत आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा योग्य आणि आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्यामुळे व दुर्लक्ष असल्यामुळे की काय येथील सर्व ठप्प झालेला व्यवहार आजही ठप्प होता अखेर सोनपेठ येथील पोस्ट मास्तर यांना दररोज ग्राहकांच्या रोशाला सामोर्य जाऊन मानसीक त्रास सहन करावा लागत आहे,या कारणांमुळे यांनीही काही तातडीच्या आर्थिक व्यवहारासाठी परभणी कार्यालयातून काम करून घेण्यासाठी परवानगी मागितल्याची माहिती मिळाली असून ठप्प झालेले येथील व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची मागणी पोस्टाच्या ग्राहकाकडून खातेदारांकडून मा.केद्रिय दुरसंचार मंत्री आश्विनी वैश्नव यांनीच जातीने लक्ष देण्याची मागणी होताना दिसत आहे.

Sunday, May 7, 2023

परळी वै.पंचक्रोशितील सर्वोच्च "श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023" जाहिर ; मे 2023 मध्ये परळी वै.येथे भव्य दिव्य गौरव सोहळ्याचे आयोजन

परळी वै.पंचक्रोशितील सर्वोच्च "श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023" जाहिर ; मे 2023 मध्ये परळी वै.येथे भव्य दिव्य गौरव सोहळ्याचे आयोजन


प्रभू वैद्यनाथ....

परळी / सोनपेठ (दर्शन):- दिवां सेवा संस्थान ,परळी तालूका पत्रकार संघ यांचे विद्यमान किर्तीवंत, यशवंत, नामवंत, प्रतिभावंत, गुणवंत अशा महान रत्न व्यक्तीमत्वास ज्यांचे गत कार्य आदर्श घेण्यासारखे असून त्यांच्या प्रमाणे पुढील पिढी घडावी व एक सुस्क्रुंत समाजप्रिय नागरिक,सामाजिक कार्यकर्ता घडावा या उदात्त हेतूने समाजातील सर्व क्षेत्रातून आमच्या श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार समितीने समाजातील त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन समाजातील विचारवंत, व नागरिकांशी चर्चा करूनसर्वानुमते एकुण 16 रत्न महान व्यक्तींची परळीवै.पंचक्रोशितील सर्वोच्च अशा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 साठी निवड केली आहे,या रत्न व्यक्तींची घोषणा आज करित आहोत.मा.आ.श्री पंडीतराव नारायणरावजी दौंड-माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र, मा.श्री विकासराव रामचंद्रजी डुबे-सामाजिक जेष्ठ नेते परळीवै.,मा.श्रीमती राधाबाई मोहनलालजी बियाणी-धर्म व संस्कार परळीवै.,मा.श्री विष्णूपंत सुभानराव सोळंके-सामाजिक कार्य नागापूर,मा.श्री शिवाजी दादा दत्तोपंत कुलकर्णी-सामाजिक कार्य अंबाजोगाई, मा श्री गणपत अप्पा शंकर अप्पा सौंदळे-जेष्ठ पत्रकार, परळीवै.,मा. श्री.सय्यद हनिफ सय्यद करीम उर्फ बहादूरभाई-सामाजिक कार्य उद्योजक परळीवै.,मा.श्री.वाल्मिकराव बाबुरावजी कराड, निष्ठा व संघटन पांगरी.ता.परळीवै, मा.श्री.संदिप सुभाषरावजी टाक- प्रतिष्ठीत व्यापारी परळीवै.,मा.श्री.गोपालसेठ बन्सिलालजी सोमाणी-धर्म आणी उद्योजक परळी वै., मा. श्री. सुंदरराव पांडूरंगरावजी गित्ते -संरपंच व युवा नेता नंदागौळ. ता.परळीवै., मा.सौ.गोदावरीताई राजारामजी मुंडे- संरपंच व सामाजिक नेत्या टोकवाडी. परळीवै. मा.सौ.सुरेखाताई विजयकुमारजी मेनकुदळे- धर्म आणी संस्कार परळीवै., मा.श्री.बाजीराव प्रकाशरावजी धर्माधिकारी मा.नगराध्यक्ष. युवा नेते परळीवै.,मा.श्री. अनिकेत द्वारकादासजी लोहिया,जलव्यवस्थापन व सामाजिक नेते अंबाजोगाई.जि.बीड, मा.श्री.रमाकांतराव अनंतरावजी जोशी, शिक्षण व्यवस्थापन व कोव्हिड योध्दा लो.सावरगाव परळीवै.  या महान गौरवमुर्तींचा गौरव सोहळा, श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 व शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन अनेक मान्यवराच्या शुभहस्ते व उपस्थीतीमध्ये मे 2023 मध्ये परळीवै.येथे भव्य दिव्य करण्यात येणार आहे. पुरस्कार गौरव सोहळा व कुलस्वामिनी दिनदर्शिका2023 -24 ची तयारी अंतीम टप्यात असून लवकरात लवकर सोहळ्याची तारिख घोषित करण्यात येईल.असे आवाहन परळीवै.येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकार दिपक वांजरखेडे मुख्य संयोजक व पत्रकार श्री.बालकिशनजी सोनी अध्यक्ष परळीवै.तालूका पत्रकार संघ परळीवै. व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Saturday, May 6, 2023

महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यीनींना सायकलचे वाटप ; विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून उज्वल भविष्य घडवावे- शौकत पठाण

महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यीनींना सायकलचे वाटप विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून उज्वल भविष्य घडवावे- शौकत पठाण


                        सोनपेठ (दर्शन):-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात दि.०६ मे २०२३ शनिवार रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष पुर्तता दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास अभियानांतर्गत विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थीनींना शाळेला येण्या-जाण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १३० सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शौकत पठाण उपशिक्षणाधिकारी(प्रा.) परभणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अनिल घनसावंत, प्रमुख उपस्थिती संस्था सचिव सुभाषअप्पा नित्रुडकर, बसलिंगअप्पा मोडीवाले, उमाकांतअप्पा कोल्हेकर, दत्तराव मस्के आंदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व सरस्वती देवी प्रतीमा पुजनाने झाली.
यावेळी बोलताना नायब तहसीलदार घनसावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले तर उपशिक्षणाधिकारी(प्रा.) शौकत पठाण यांनी सायकलचा वापर करून नियमित शाळेत येण्याचे व कठीण परीश्रम घेवून उज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. त्यानंतर शै.वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येवून प्रगती पुस्तकाचे वाटप करण्यात आले.शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानव विकास योजने अंतर्गत पात्र विद्यार्थीनिंना सायकलचे वाटप करण्यात आले.लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांनींना बसची प्रतिक्षा करत शाळेला येण्या जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा आणि वेळ पण जायचा त्यामुळे त्यांना मानव विकास योजने अंतर्गत सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये आनंद दिसून आला.यावेळी गावातील पालकांसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सायकल वाटप विभाग प्रमुख सहशिक्षक कालिदास मस्के यांच्यावतीने देण्यात आलेल्या अल्पोपहारानंतर झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक पंढरीनाथ जोशी यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक श्रीकांत परळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक रमाकांत होडगे यांनी केले.
--------------------------------------------------------------------
साप्ताहिक सोनपेठ दर्शन सबसे तेज बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752....
--------------------------------------------------------------------