Thursday, June 2, 2022

शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राविषयी विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राविषयी  विद्यार्थ्यांना आवाहन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

पुढील काही दिवसांमध्ये २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष चालू होत असून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी तथा विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (NCL) , केंद्रीय नमुन्यातील जात प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. या सर्व प्रमाणपत्राचे वितरण महसूल विभागामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाईन) करण्यात येते. प्रतिवर्षाचा अनुभव पाहता सर्वच अर्जदार ऐनवेळी अर्ज करून तातडीने प्रमाणपत्रांची मागणी करतात परंतु संगणकीय प्रणालीमध्ये किंवा अन्य तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने इच्छा असूनही वेळेत प्रमाणपत्र निर्गमित करणे शक्य होत नाही किंबहूना कागदपत्राची पडताळणी करताना अनेक अडचणीस सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपण आपल्या पाल्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारे आवश्यक ते दाखले, प्रमाणपत्रे वेळीच परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करून काढून घ्यावेत जेणेकरून आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान व आर्थिक पिळवणूक होणार नाही. तसेच कोणत्याही नागरीकास प्रमाणपत्रांसाठी जर कोणताही इसम किंवा ई-सेवा केंद्रचालक प्रमाणपत्रासाठी निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरीक्त अवाजवी रकमेची मागणी करत असल्यास तात्काळ या कार्यालयाचे निदर्शनास आणून द्यावे. असे दत्तु शेवाळे उपविभागीय अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment