सोनपेठ तालुक्यातील 4 गट व 8 गणांचा प्रारुप मसुदा प्रसिध्द
जिल्हा परिषदेंतर्गत गट व पंचायत समितीच्या गणांच्या संख्येसह व्याप्ती बाबतचा प्रारुप मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरीकांसाठी गुरुवारी (दि.02) प्रसिध्द करण्यात आला.
दरम्यान, या प्रारुप मसुद्याबाबत ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात 2 जून ते 8 जून या कालावधीत लेखी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाच्या संख्येसह व्याप्ती संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकार्यांनी पक्रिया सुरु केली. पाठोपाठ गुरुवारी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणारा प्रारुप मसुदा नागरीकांसाठी प्रसिध्द केला. संबंधित उपविभागीय अधिकार्यांनी या अनुषंगाने कारवाई पूर्ण केली.पाठोपाठ त्या त्या तालुक्यात पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाच्या दर्शनी भागात या संबंधीचा प्रारुप मसूदा बोर्डवर झळकविण्यात आला आहे.
या प्रारुप मसुद्यामधून त्या त्या तालुक्यात जिल्हा परिषद गटाची संख्या व निर्वाचक गणांची संख्या नमूद करण्यात आली असून त्याची व्याप्तीसुध्दा दर्शविण्यात आली आहे.सोनपेठ तालुक्यातील 4 गट व 8 गणांच्या संख्या व त्यांच्या व्याप्तीसंदर्भात माहिती
गट (1) शेळगाव (म).
गण (1) शेळगाव (म) - शेळगाव (म),शेळगाव (ह), भाऊचा तांडा, विटा खुर्द, वाघलगाव,वाणीसंगम व दुधगाव.
गण (2) शिर्शी (बु) - शिर्शी (बु), सखाराम तांडा, लोहीग्राम, लोहिग्राम तांडा, गंगापिंपरी, गोळेगाव, थडी उक्कडगाव,थडी पिंपळगाव,वाडी पिंपळगाव व लासीना.
गट (2) नरवाडी.
गण (3) नरवाडी - नरवाडी, सायखेडा, तुकाई तांडा, देवीनगर, मुंशीराम तांडा व चुकार पिंपरी.
गण (4) कान्हेगाव - कान्हेगाव, डोबाडी तांडा, शिरोरी, खडका,मोहळा, भिसेगाव, पोंहडुळ व पोंहडुळ तांडा.
गट (3)डिघोळ (ई).
गण (5) डिघोळ (ई) - डिघोळ (ई), रेवा तांडा, निमगाव खपाट पिंपरी, गवळी पिंपरी व धार डिघोळ.
गण (6) नैकोटा - नैकोटा, वाडी नैकोटा, आवलगाव, कोठाळा, कोठाळा तांडा, बौंदरगाव व धामोनी.
गट (4) उखळी (बु).
गण (7) उखळी (बु) - उखळी (बु),उखळी (बु) तांडा,पारधवाडी,बुक्तरवाडी, उक्कडगाव मक्ता व करम.
गण (8) वडगाव - वडगाव,मरगळवाडी,निळा, वैतागवाडी,तिवठाणा,वंदन व कोरटेक असे आहेत.
-------------------------------------------
सोनपेठ तालुक्यातील एकमेव जनतेचा आवाज सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन.मो.9823547752.
--------------------------------------------


No comments:
Post a Comment