जागतीक मृदा दिना निमीत्त शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी तालुक्यातील मौजे करडगाव येथे दि . ०५ डिसेंबर 2021 जागतीक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो . त्या निमित्ताने स्मार्टकम टेक्नॉलॉजीस लि . पुणे ( महाधन ) व भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग , वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने करडगाव ता. जि . परभणी येथे शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, डॉ. प्रवीण वैदय (विभाग प्रमुख मृद विज्ञान विभाग वनामकृवि परभणी) यांनी जमीनीची क्षारता थांबवा, जमीनीची उत्पादकता वाढवा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले . विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी दिर्घकालीन खत प्रयोग प्रकल्प वनामकृवि परभणी डॉ . रामप्रसाद खंदारे यांनी जिवाणु खतांचा वापर काळाची गरज या विषयावर शेतकऱ्यांना अचुक असे मार्गदर्शन केले.
महाधनचे झोनल ट्रेनींग मॅनेजर डॉ. निशिकांत इनामदार यांनी स्मार्टेक व क्राॅपटेक खत तंत्रज्ञानातुन अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या नव्या दिशा व संतुलीत खत व्यवस्थापन या विषयावर विस्तृत विवेचन केले . या कार्यक्रमाचे आयोजन महाधनचे जिल्हा विक्री अधिकारी श्री. प्रशांत हावळे व जिल्हा विपणन अधिकारी श्री. वैभव दळवी यांनी केले होते, कार्यक्रमास करडगाव चे प्रथम नागरीक , प्रगतशील शेतकरी , विद्यापिठातील संशोधक व विद्यार्थ्यी बहूसंख्येने उपस्थीत होते.

No comments:
Post a Comment