जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व धर्मिय दिव्यांग वधू - वर परिचय मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे सपन्न
प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन व ओंकार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रम मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ क़डू यांनी कार्यक्रमास दिल्या भ्रमणध्वणी वरून शुभेच्छा .प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन व ओंकार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरी जि. परभणी येथे सर्व धर्मिय दिव्यांग वधू - वर परिचय मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगदिश शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्विय सहायक तथा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. संतोष राजगुरु, गटविकास अधिकारी श्री. सुहास कोरेगावे, श्री. शिवाजी सवणे, मुकुंद खरात, श्री सचिन परळकर,राजेश दहिवाळ, ,रहिम शेख, राम काकडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन, पाथरी तालुका प्रमुख श्री दिपक खुडे हे होते.या दिव्यांग सर्वधर्मिय वधू - वर परिचय मेळाव्यास दिव्यांग बंधू -भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमास शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जलसंधारण राज्यमंत्री श्री.बच्चूभाऊ कडू यांनी भ्रमणध्वनीवरुन सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
या वधू वर परिचय मेळाव्यात दोन दिव्यांग परिवाराचे लग्न जमले आहे. हे ह्या कार्यक्रमाचे यश होते.या कार्यक्रमात बोलतांना श्री. संतोष राजगुरु यांनी दिव्यांग बांधवांनी आपल्या अंगभूत कौशल्याला ओळखुन त्या कौशल्याचा विकास करून उदरनिर्वाह साठी याचा उपयोग करावा असे सांगीतले. कुंटुबाला ओझे न होता दिव्यांग बांधवांनी स्वत : चे व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन हि त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सतीश नखाते,विष्णू नखाते,बी के साळवे,नितीन वैराळ,तोफिक अन्सारी,परमेश्वर पवार,गणेश शिंगाडे,राम जाधव,चंदु रनेर या सर्वांनी प्रयत्न केले.प्रत्यक्ष -अपत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वाचे जाहिर आभार श्री. दिपक खुडे ता. प्रमुख तथा संयोजक प्रहार अंपग क्रांती आंदोलन यांनी केले.




No comments:
Post a Comment