Friday, December 31, 2021

सा.सोनपेठ दर्शन व सर्कल ॲप सोनपेठ अपडेट तर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभकामना.....!!!!!

सा.सोनपेठ दर्शन व सर्कल ॲप सोनपेठ अपडेट तर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभकामना.....!!!!!





 2021   " सरणारे वर्ष मी "     2022
                 -------------------

मी उद्या असणार नाही 
असेल कोणी दूसरे 
मित्रहो सदैव राहो 
चेहरे तुमचे हासरे 

झाले असेल चांगले 
किंवा काही वाईटही मी 
माझे काम केले 
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु 
तुमची माझी नाळ आहे 
भले होओ , बुरे होओ 
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु 
आणि दोषही देऊ नका 
निरोप माझा घेताना 
गेट पर्यन्त ही येऊ नका 

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली 
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली 

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला 
तुम्ही मला खुशाल विसरा 
दोष माझा प्राक्तनाला 

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही 
मी माझे काम केले 
बाकी दूसरे काही नाही 

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही 
" वचन " हे कसे देऊ 
जे मी पाळणार नाही 

मी कोण ? सांगतो 
" शुभ आशीष " देऊ द्या 
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या। 
- मंगेश पाडगावकर

सरणार्या वर्षाला 2021 नमस्कार करूयात अन् येणार्या वर्षाला 2022 आपलंसं करूयात.....!!!!!
काळजी घ्या..हसत रहा,आनंदी रहा.....!!!!!

Tuesday, December 28, 2021

पाथरी विरशैव मठात रंभापुरी जगतगुरूची 30 रोजी धर्म सभा

पाथरी विरशैव मठात रंभापुरी जगतगुरूची 30 रोजी धर्म सभा


पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-
पाथरी येथील श्री गुरू कांचबसवेश्वर मठात 30 डिसेंबर रोजी बसवलिंग शिवाचार्य महाराज पाथरीकर यांच्या समाधीवर लिंगस्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगतगुरु प्रसन्न रेणुकाचार्य डॉ वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी रंभापुरी पीठ कर्नाटक यांच्या हस्ते होणार आहे हा कार्यक्रम काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे ,सकाळी 6 वाजता समाधी रुद्राभिषेक 9 वाजता वीर सिंहासनाधिश्वर डॉ वीर सोमेश्वर शिवाचार्य रंभापुरी पीठ यांची शोभायात्रा होणार आहे
शोभा यात्रा पाथरी येथील गणेश नगर येथील चंद्रकांत खके येथून पाथरी मठ संस्थान असा निघणार आहे
दुपारी 12.30 वाजता वीरभद्र देवतेची मूर्तीस्थापना व बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीवर लिंग स्थापना करण्यात येणार आहे दुपारी 1 वाजता रंभापुरी पिठाचे महाराज यांची धर्म सभा  होणार आहे यावेळी विविध मठाचे मराठवाडा भागातील सर्व शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ष ब्र श्री गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांनी केले आहे.


Monday, December 27, 2021

ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमाताई रसाळ यांना 'परभणी भूषण पुरस्कार' जाहीर

ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमाताई रसाळ यांना 'परभणी भूषण पुरस्कार' जाहीर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमाताई रवींद्र रसाळ यांना यंदाचा 'परभणी भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक गोदातीर समाचारच्या वतीने विविध क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहून परभणीचा लौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. 
         दिनांक 1 जानेवारी 2022 ला श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
         यापूर्वी सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर(2013), प्राचार्य डॉ. बी. एस. सोळुंके (2014), गोंधळमहर्षि राधाकृष्ण कदम (2015), स्वातंत्र्यसैनिक शाहीर प्रभाकर वाईकर (2016), शिक्षणतज्ञ लक्ष्मीकांत पांडे (2017), आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एच. सहजराव (2018) या मान्यवरांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेली दोन वर्ष कार्यक्रमात खंड पडला होता. यावर्षीपासून पुन्हा 'परभणी भूषण' या पुरस्काराचे सातत्य राखले गेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गोदातीर समाचारचे संपादक रमेश गोळेगावकर यांच्यासह श्रीमती माधुरी क्षीरसागर, आसाराम लोमटे यांनी केले आहे.
श्रीमती हेमाताई रसाळ यांचा संक्षिप्त परिचय:
कराड, जिल्हा सातारा येथे दि. 26 नोव्हेंबर 1947 रोजी जन्म. सातारा व अहमदनगर येथून बीए बीकॉम, त्यानंतर एलएलबी . विवाहानंतर नांदेड येथे मराठवाड्यातील पहिले दैनिक म्हणून ओळख असलेल्या गोदातीर समाचार परिवारात दाखल.तब्बल पन्नास वर्षापूर्वी तंत्रज्ञान फारसे प्रगत नसताना बातम्या गोळा करण्यापासून ते प्रूफ रीडिंग आणि अंकाची पार्सले टाकण्यापर्यंतचे काम. नांदेड, लातूर या ठिकाणी काही काळ घालवल्यानंतर परभणीतच कायमचे वास्तव्य, गोदातीर समाचारच्या परभणी आवृत्तीच्या दीर्घकाळ संपादक, स्त्री मुक्ती संघटना, पथनाट्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच, बाल न्यायालय, महिला दक्षता समिती, असंघटित महिला कामगार, मोलकरीण संघटना अशा विविध आघाड्यांवर सामाजिक कार्य. विविध क्षेत्रातील महिलांना संघटित करून महिला जागृती संघटनेची स्थापना, स्त्री मुक्ती संघटनेचे आंदोलन, परित्यक्ता हक्क परिषद, राज्यव्यापी हुंडाविरोधी परिषद, साक्षरता अभियान, शेतकरी चळवळ अशा महत्वपूर्ण उपक्रमांच्या आयोजनात कृतिशील सहभाग, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत, संपादक संघटनेच्या दर्पण पुरस्कारासह अन्य संस्थांकडूनही सन्मान.

Thursday, December 23, 2021

श्री नगरेश्वर मंदिर येथील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
सोनपेठ (दर्शन) :-
वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह दि.24डिंसे.रोजी प्रारंभ तर दि.31डिंसे.रोजी समाप्ती,श्री नगरेश्वर मंदिर येथे याप्रसंगी कीर्तनकार अमोल गोरे, हरिदास पौळ,प्रभाकर शास्त्री,भीमाशंकर एरंडेश्वर,एकनाथ माने, सोमनाथ बदाले,माधव कुरे तसेच दिलीप ब्रह्मपुरीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Monday, December 20, 2021

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप ; शेतकऱ्यांना तक्रार देण्याची आवश्यकता नाही - जिल्हाधिकारी आंचल गोयल

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप ;
शेतकऱ्यांना तक्रार देण्याची आवश्यकता नाही - जिल्हाधिकारी आंचल गोयल



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

खरीप हंगाम 2021-22 अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकुण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्यापैकी सोयाबीन पिकाचे एकुण 3 लाख 1 हजार 676, कापुस पिकाचे 43 हजार 828,  तुर पिकाचे 1 लाख 8 हजार 571, मुग पिकाचे 1 लाख 12 हजार 223, उडीद पिकाचे 40 हजार 882, खरीप ज्वारी पिकाचे 24 हजार 285 व बाजरी पिकाचे 3 हजार 66 असेस एकुण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी  पिक विमा भरलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी तक्रार दिली होती त्यांना त्याच पिकाच्या पिक वाढीची अवस्था, नुकसानीची टक्केवारी व पुर्वसुचना ज्या महिन्यामध्ये दिली त्या कालावधीनुसार पिक विमा वाटप करण्यात आला आहे.  ज्या शेतकर्यांेनी पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसानीची पुर्वसुचना दिली नव्हती त्या शेतकर्यांवना पिक कापणी प्रयोग आधारीत महसुल मंडळ निहाय पिक विमा लागु झाल्यास राज्य व केंद्र सरकारचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक विमा वाटप करण्यात येईल. त्यांना आता तक्रार देण्याची आवश्यकता नाही तरी त्यांनी तक्रार देण्यासाठी कार्यालयात गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली.
  शासन निर्णय क्र. प्रपीवियो-2020/प्र.क्र.40/11-ऐ दि.29 जुन 2020 नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021-22 परभणी जिल्ह्यामध्ये  रिलायन्स जनरल इन्शुरस कंपनीमार्फत राबविण्यास मान्यता मिळाली.माहे जुलै व सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासन निर्णय मुद्दा क्र.10.4 नुसार वैयक्तिकस्तरावर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची एकुण 3 लाख 78 हजार 307 शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस विविध मार्गानी नुकसानीच्या पुर्वसुचना दिल्या. त्यापैकी 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना पिक विमा कंपनीने पात्र ठरविल्या व उर्वरीत 27 हजार 147 शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना परत परत (Duplicate) असल्यामुळे पिक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या आहेत.पात्र ठरलेल्या 3 लाख 51 हजार 160 शेतकऱ्यांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 272.24 कोटी विमा मंजुर करण्यात आला.त्यापैकी दि.20 डिसेंबर 2021पर्यंत 3 लाख 44 हजार 944 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 269.98 कोटी पिक विमा जमा करण्यात आला आहे.उर्वरीत पात्र 6 हजार 216 शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वाटप करण्याची प्रक्रिया चालु असुन लवकरात लवकर जमा होणार आहे.
   तसेच शा.नि.प्रपिवियो2020/प्र.क्र.40/11-अ‍ दि. 29-06-2020 मधील मुद्दा क्र. 10.2 नुसार अधिसुचित केलेल्या पिक विमा क्षेत्रातील तुर या अधिसुचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तुर पिकाचे एकुण संरक्षित क्षेत्राच्या 5 टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करुन शासन निर्णयातील मुद्दा क्र. 10.2 नुसार जे महसुल मंडळ पात्र होतील त्या अधिसुचित महसुल मंडळासाठी दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी काढलेली अधिसुचना  लागु राहील. यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर कोणत्याही कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार देण्याची गरज नाही. असे आवाहनही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. 
-*-*-*-*-

Wednesday, December 15, 2021

कोविड आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत

कोविड आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत
परभणी / सोनपेठ (दर्शन):- 
कोव्हिड -१९ या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास  ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा . सर्वोच्च न्यायालयाने दि .०४.१०.२०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार , महसूल व वन ( आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन ) विभागाने शासन निर्णय क्र . सीएलएस / २०२१ / प्र.क्र .२५४ / -३ , दि . २६.११.२०२१ अन्वये प्रसारीत केला आहे . या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून याद्वारे कोव्हिड -१ ९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित नातेवाईक यांनी mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील . तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे . अर्जदार हे राज्य शासनाने वरील विकसित केलेल्या वेब पोर्टलवर स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC - SPV मधून अर्ज करु शकतात. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.
            अर्जासोबत १ ) अर्जदाराचा स्वतःचा तपशील , आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक २ ) अर्जदाराचा स्वत : चा बँक तपशील ३ ) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील ४ ) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १ ९ ६ ९ खालील मृत्यू प्रमाणपत्र ५ ) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र आदी  कागदपत्रे व माहिती सादर करणे बंधनकारक राहील. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र . सार्वजनिक आरोग्य विभाग , न्यायिक -२०२१ / प्र.क्र .४८८ / आरोग्य -०५ , दिनांक १३ ऑक्टोबर , २०२१ अन्वये जिल्हास्तर / महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणाची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील . अर्ज अंतिमतः मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील . सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज ७ दिवसांकरिता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील , जेणेकरून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल . जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार , संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. असेही कळविण्यात आले आहे.

Monday, December 13, 2021

जुडो हा खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचन्यासाठी प्रयत्न करावेत: प्रा डॉ मुंजाभाऊ धोंडगे

जुडो हा खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचन्यासाठी प्रयत्न करावेत: प्रा डॉ मुंजाभाऊ धोंडगे

सोनपेठ (दर्शन) :-

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ व वैद्यनाथ महाविद्यालय परळी वै यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन जुडो निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ मुंजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना जुडो हा खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे असे मत डॉ मुंजाभाऊ धोंडगे यांनी व्यक्त केले,यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणे प्राचार्य डॉ व्ही डी मेश्राम,उपप्राचार्य डॉ विजय चव्हाण,प्रा.आंधळे जुडो संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, जोशी अतुल, कुलकर्णी क्रीडा विभागाचे संचालक तथा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ. पी एल कराड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सहभागी महाविद्यालयाचे प्रमुख खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच डॉ आत्तमाराम टेकाळे, डॉ.पांडुरंग राणमाळ प्रा. प्रवीण दिग्रसकर, गुजरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध.डॉ पी एल कराड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अर्चना चव्हाण यांनी केले.

Thursday, December 9, 2021

जागतीक मृदा दिना निमीत्त शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न

जागतीक मृदा दिना निमीत्त शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी तालुक्यातील मौजे करडगाव येथे दि . ०५ डिसेंबर 2021 जागतीक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो . त्या निमित्ताने स्मार्टकम टेक्नॉलॉजीस लि . पुणे ( महाधन ) व भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग , वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने करडगाव ता. जि . परभणी येथे शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, डॉ. प्रवीण वैदय  (विभाग प्रमुख मृद विज्ञान विभाग वनामकृवि परभणी) यांनी जमीनीची क्षारता थांबवा, जमीनीची उत्पादकता वाढवा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले . विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी दिर्घकालीन खत प्रयोग प्रकल्प वनामकृवि परभणी डॉ . रामप्रसाद खंदारे यांनी जिवाणु खतांचा वापर काळाची गरज या विषयावर शेतकऱ्यांना अचुक असे मार्गदर्शन केले.
 महाधनचे झोनल ट्रेनींग मॅनेजर डॉ. निशिकांत इनामदार यांनी स्मार्टेक व क्राॅपटेक खत तंत्रज्ञानातुन अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या नव्या दिशा व संतुलीत खत व्यवस्थापन या विषयावर विस्तृत विवेचन केले . या कार्यक्रमाचे आयोजन महाधनचे जिल्हा विक्री अधिकारी श्री. प्रशांत हावळे व जिल्हा विपणन अधिकारी श्री. वैभव दळवी यांनी केले होते, कार्यक्रमास करडगाव चे प्रथम नागरीक , प्रगतशील शेतकरी , विद्यापिठातील संशोधक व विद्यार्थ्यी बहूसंख्येने उपस्थीत होते.

Wednesday, December 8, 2021

कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक

कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांना स्वारातीम वि.चे एम.ए. इंग्रजीत सुवर्ण पदक

परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून दयानंद महाविद्यालय लातूरच्या विद्यार्थीनी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी एम.ए.इंग्रजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रीती रांजणकर या परळी शहर व सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या आहेत.
भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या कु.प्रिती गोपाळराव रांजणकर या दयानंद महाविद्यालय लातूर येथे कला शाखेतील एम.ए.विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या.सदरील कला शाखेच्या परिक्षेचा निकाल दि.७ डिसेंबर २०२१ रोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड ने जाहीर केला असून या निकालात कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी कला शाखेच्या एम.ए.पदवी परिक्षेत ८७.८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.विशेष बाब म्हणजे त्यांना एम.ए.इंग्रजी या विषयात स्वारातीम विद्यापीठातून सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.त्यांनी संपादन केलेल्या या यशाचे कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदन ही होत आहे.  कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Tuesday, December 7, 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची न भूतो न भविष्यती अशी मुंबईतील महाप्रचंड अंतयात्रा (७ डिसेंबर १९५६)

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची न भूतो न भविष्यती अशी मुंबईतील महाप्रचंड अंतयात्रा (७ डिसेंबर १९५६)


सोनपेठ (दर्शन) :-

आधुनिक भारताचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह डाकोटा विमानाने दिल्लीहून मुंबईला आणण्यात आले, विमानतळ ते राजगृह पर्यंतच्या  रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक दुखी अंतकरणाने रडत होते. दादर ( हिंदू कॉलनी) येथील त्यांचे राजगृह या निवासस्थानी त्यांचा देह शे.का.फेडरेशनच्या ध्वजात लपेटून दर्शनार्थ ठेवण्यात आला होता.
बाबासाहेबांची अंतयात्रा राजगृह, दादर वरून १.४० वाजता निघाली दादर व्हीन्सेंन्ट रोड म्हणजेच आताचा डॉ.आंबेडकर रोड पोयबावडी,परळ,एल्फिन्स्टन ब्रिज, सयानी रोड,गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत म्हणजेच आता चैत्यभूमीत सायंकाळी ६.०० वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून लाखो लोक दुखी अंतकरणाने सामील झाले होते. ज्या वेळी भारतात टीव्ही, मोबाइल, इंटरनेट सारखी प्रसारमाध्यमे नव्हती त्यावेळी फक्त रेडिओच्या बातमीवर लाखोंचा जनसमुदाय हा मुंबईत एकवटला होता.
याची कल्पना आपल्याला या छायाचित्रावरून करता येईल!

- बुध्दभुषण भिमराव गवई
      7350697495.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची न भूतो न भविष्यती अशी मुंबईतील महाप्रचंड अंतयात्रा (७ डिसेंबर १९५६)

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची न भूतो न भविष्यती अशी मुंबईतील महाप्रचंड अंतयात्रा (७ डिसेंबर १९५६)

सोनपेठ (दर्शन) :-

आधुनिक भारताचे निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह डाकोटा विमानाने दिल्लीहून मुंबईला आणण्यात आले, विमानतळ ते राजगृह पर्यंतच्या  रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक दुखी अंतकरणाने रडत होते. दादर ( हिंदू कॉलनी) येथील त्यांचे राजगृह या निवासस्थानी त्यांचा देह शे.का.फेडरेशनच्या ध्वजात लपेटून दर्शनार्थ ठेवण्यात आला होता.
बाबासाहेबांची अंतयात्रा राजगृह, दादर वरून १.४० वाजता निघाली दादर व्हीन्सेंन्ट रोड म्हणजेच आताचा डॉ.आंबेडकर रोड पोयबावडी,परळ,एल्फिन्स्टन ब्रिज, सयानी रोड,गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत म्हणजेच आता चैत्यभूमीत सायंकाळी ६.०० वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून लाखो लोक दुखी अंतकरणाने सामील झाले होते. ज्या वेळी भारतात टीव्ही, मोबाइल, इंटरनेट सारखी प्रसारमाध्यमे नव्हती त्यावेळी फक्त रेडिओच्या बातमीवर लाखोंचा जनसमुदाय हा मुंबईत एकवटला होता.
याची कल्पना आपल्याला या छायाचित्रावरून करता येईल!

- बुध्दभुषण भिमराव गवई
      7350697495.

Monday, December 6, 2021

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
 

 परभणी / सोनपेठ (दर्शन):- 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 15 डिसेंबर  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.      
या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व धर्मिय दिव्यांग वधू - वर परिचय मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे सपन्न

जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने सर्व धर्मिय दिव्यांग वधू - वर परिचय मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे सपन्न

पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन व ओंकार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रम मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ क़डू यांनी कार्यक्रमास दिल्या भ्रमणध्वणी वरून शुभेच्छा .प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन व ओंकार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरी जि. परभणी येथे सर्व धर्मिय दिव्यांग वधू - वर परिचय मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगदिश शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्विय सहायक तथा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. संतोष राजगुरु, गटविकास अधिकारी श्री. सुहास कोरेगावे, श्री. शिवाजी सवणे, मुकुंद खरात, श्री सचिन परळकर,राजेश दहिवाळ, ,रहिम शेख, राम काकडे  यांची उपस्थिती होती. 
 या कार्यक्रमाचे संयोजक प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलन, पाथरी तालुका प्रमुख श्री दिपक खुडे हे होते.या दिव्यांग सर्वधर्मिय वधू - वर परिचय मेळाव्यास दिव्यांग बंधू -भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमास शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जलसंधारण राज्यमंत्री श्री.बच्चूभाऊ कडू यांनी भ्रमणध्वनीवरुन सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
या वधू वर परिचय मेळाव्यात दोन दिव्यांग परिवाराचे लग्न जमले आहे. हे ह्या कार्यक्रमाचे यश होते.या कार्यक्रमात बोलतांना श्री. संतोष राजगुरु यांनी दिव्यांग बांधवांनी आपल्या अंगभूत कौशल्याला ओळखुन त्या कौशल्याचा विकास करून उदरनिर्वाह साठी याचा उपयोग करावा  असे सांगीतले. कुंटुबाला ओझे न होता दिव्यांग बांधवांनी स्वत : चे व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन हि  त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सतीश नखाते,विष्णू नखाते,बी के साळवे,नितीन वैराळ,तोफिक अन्सारी,परमेश्वर पवार,गणेश शिंगाडे,राम जाधव,चंदु रनेर या सर्वांनी  प्रयत्न केले.प्रत्यक्ष -अपत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वाचे जाहिर आभार श्री. दिपक खुडे ता. प्रमुख तथा संयोजक प्रहार अंपग क्रांती आंदोलन यांनी केले.

Saturday, December 4, 2021

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

परभणी / सोनपेठ (दर्शन):- 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            रविवार दि.5 डिसेंबर 2021 रोजी जालना येथून मोटारीने परभणी येथे सकाळी 10: 30 वाजता आगमन व कौशल्या किडनी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शुभारंभास उपस्थिती (स्थळ- बस स्टँड जवळ परभणी). सकाळी 11:30 वाजता कॅथलॅब व कार्डियाक डायग्नोस्टिक सेंटर शुभारंभास उपस्थिती (स्थळ- न्यू डॉक्टर लेन). दुपारी 12:00 वाजता देशमुख डायग्नोस्टिक सेंटर व परभणी मेडिकल व सर्जिकल शुभारंभ उपस्थिती (स्थळ- शिवाजी नगर). दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी बैठक (स्थळ- राष्ट्रवादी भवन परभणी). त्यानंतर सोयीनुसार जालनाकडे प्रयाण करतील.
                          -*-*-*-*-