Sunday, August 15, 2021

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित

दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात सहकुटुंब सौरभ चे अभिनंदन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी डावीकडून सर्वेश नावंदे, कविता नावंदे, रुतुजा नावंदे, सुभाष नावंदे युवा क्रिकेटपटू भुषण भीमाशंकर नावंदे दिसत आहेत.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते  राष्ट्रीय युवा पुरस्कार स्वीकारताना सौरभ नावंदे या वेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडण्ड दिसत आहेत.

परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन) :-

   देशातील युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी मूळचा परचुंडी ता परळी येथील व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सौरभ नावंदे याला सन 2017-18 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सन 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रीय युवा पुरष्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्रालय सचिव उषा शर्मा व संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडड उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमात सन 2017-18 साठी 14  व 2018-19 साठी 8अशा 22 पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात सौरभला सन 2017-18 च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने रु एक लाख ,पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
      सौरभ नावंदे याने 2017 मध्ये  क्वालालंपूर येथे आयोजित ’राष्ट्र मंडल युवा शिखर संमेलनात’ आणि 2018 मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित ’संयुक्त राष्ट्र सभेत’ भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याला महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 दरम्यान महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सौरभचे अभिनंदन केले.तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खा.प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेकांनी  सौरभचे अभिनंदन केले.
सौरभ हा सेवानिवृत्त क्रीडाधिकारी सुभाष नावंदे व  औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा मुलगा असून, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे ,सामजिक कार्यकर्ते रामलिंगआप्पा नावंदे यांचा तो पुतण्या आहे.सौरभला या राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित  करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





No comments:

Post a Comment