जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीमती गोयल यांनी परिधान केलेल्या आकर्षक फेट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचीही पालकत्वाची जबाबदारी असल्याने ते ध्वजारोहणासाठी यावेळी परभणीला येऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, आमदार राहुल पाटील, आमदार, मेघना बोर्डीकर जि.प.चे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जयंत मीना आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी संबोधित केले.


No comments:
Post a Comment