Saturday, August 28, 2021

युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा :एस.एम.देशमुख यांची मागणी

युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी 
जाहिराती सुरू करा :एस.एम.देशमुख यांची मागणी



उरळी कांचन / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियासाठी पुरस्कार सुरू केला आहे.. त्याच धर्तीवर युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. 
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद नावाचा एक स्वतंत्र सेल सुरू केला आहे. त्याच्या तालुका आणि जिल्हा स्तरावर शाखा सुरू करण्यात येत आहेत.. पुणे जिल्ह्यातील  दौड आणि हवेली तालुका शाखेचा शुभारंभ आज एस.एम.देशमुख यांच्या हस्ते उरळी कांचन येथील मेमाने फार्म वर करण्यात आला.. यावेळी पुणे जिल्हा प़मुख म्हणून जनार्दन दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली.. 
आपल्या भाषणात एस.एम.देशमुख म्हणाले, पुढील काळ हा डिजिटल मिडियाचा आहे.. आज महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात किमान ५० चॅनल्स किंवा पोर्टल्स सुरू आहेत.. राज्यातील ३५० तालुक्याचा हिशोब करता राज्यात १७,५०० चॅनल्स कार्यरत आहेत.. यातील अनेक चॅनल्सकडे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त सबस्क़ाइबर आहेत.. अशा सर्व चॅनल्सना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माधयमाप़माणेच जाहिराती मिळाल्या पाहिजेत.. नव्या दमाचे तरूण पत्रकार या माध्यमात कार्यरत असले तरी स्वतःच्या खिशयाला तोशिष लावून हे सर्व जण पत्रकारिता करीत आहेत.. त्यांना सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे.. 
आरएनआय प़माणे चॅनल्स साठी स्वतंत्र नोंदणी व्यवस्था तयार करून डिजिटल माध्यमांना अधिकृत मान्यता दिली जावी.. पुढील काळात या माध्यमाचा होणारा विस्तार लक्षात घेऊन काही अटी व शर्थीच्या अधिन राहून या माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी देखील एस.एम.देशमुख यांनी केली आहे.. 
डिजिटल माध्यमांना सरकार आणि समाज मान्यता नाही. ती मिळवायची असेल तर या माध्यमाने आपली विश्वासार्हता वाढविली पाहिजे.. असे आवाहन करतानाच एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांना नवीव तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आणि आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले.. सोशल मिडिया प्रत्येकाच्या हाती असल्याने प़त्येक व्यक्तीच आज पत्रकाराच्या भूमिकेत आहे.. त्यामुळे आपण वेगळे काही दिले नाही तर स्पर्धेत आपण टिकू शकणार नाही असा इशारा देखील एस.एम.देशमुख यांनी दिला.. 
महाराष्ट्रा सोशल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यात सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत.. या संघटनेत काम करू इचछिणारया डिजिटल मिडियातील पत्रकारांनी परिषदेकडे संपर्क साधावा असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले.. 
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, यांची भाषणं झाली.. कार्यक़मास पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, परिषद प़तिनिधी एम. जी. शेलार, घुसाळकर, हवेली तालुका अध्यक्ष काळभोर आदि उपस्थित होते..

बेशिस्त अधिकारी-कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची धास्ती : कामकाजात बदल

बेशिस्त अधिकारी-कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची धास्ती : कामकाजात बदल

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या जिल्ह्यात रुजू झाल्यापासून महसूल यंत्रणेसह अन्य यंत्रणांतर्गत बेशिस्त अधिकारी - कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.
      जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या मुंबईतून पदभार स्विकारल्या पाठोपाठ दुसर्‍या दिवशी परभणी गाठून दोन दिवस राज्यपालांच्या दौर्‍यात व्यस्त होत्या.राज्यपालांचा दौरा आटोपल्यानंतर श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्ष केंद्रीत केले. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध विभागांना भेटी दिल्या. तेथील विभाग प्रमुखांबरोबर, कर्मचार्‍यांबरोबर हितगूज केले. जिल्हाधिकार्‍यांच्या या विभागनिहाय भेटीगाठीने जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत बेशिस्त अधिकारी-कर्मचारी अक्षरशः हादरले. या भेटीतून श्रीमती गोयल यांनी त्या-त्या विभागांतर्गत भौतिक सुविधांचीसुध्दा पाहणी केली. विशेषतः अस्वच्छतेवर अधिकारी-कर्मचार्‍यांना चांगलेच सूनावले. आपण ज्या ठिकाणी तासन्तास काम करीत आहोत त्या जागा स्वच्छ व प्रसन्न असल्या पाहिजे, असे सूनावले.
    श्रीमती गोयल यांनी गंगाखेड त्यापाठोपाठ पाथरी, मानवत तालुक्यांचाही दौरा केला. तेथील तहसील कार्यालयांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे पाथरी व मानवत नगरपालिका कार्यालयांनाही भेटी दिल्या. मुख्याधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांबरोबर हितगूज केले. काही विकास कामांबाबत चर्चाही केली.
        परभणी महापालिकेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासही भेट देवून जिल्हाधिकारी गोयल यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना, संबंधित कंत्राटदारांना मोठा धक्का दिला. या उद्यानातील विकाास कामांवर, सौंदरीकरणावर महापालिकेने 1 कोटी 8 लाख रुपयांचे बिल अदा केले आहे. प्रत्यक्षात या उद्यानात त्या तुलनेत टिचभरसुध्दा कामे नाहीत. या पार्श्‍वभूमीवर श्रीमती गोयल यांची भेट महत्वपूर्ण ठरली आहे. बोरवंड भागातील घनकचरा प्रकल्पासही श्रीमती गोयल यांनी भेट दिली. तो प्रकल्प पूर्ण झाला आहे. परंतु, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. गंभीर बाब म्हणजे धार रस्त्यावरील अनाधिकृत अशा कचरा डेपोवर अद्यापही कचरा नेवून टाकला जातो आहे, मात्र कागदोपत्री मनपाद्वारे बोरवंडला कचरा जमा केला जात असल्याचे नमूद केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीमती गोयल यांची भेट निश्‍चितच धक्कादायक ठरली आहे.
     दरम्यान,श्रीमती गोयल या जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना, नगरपालिका कार्यालयांना भेटी देतील, हे ओळखून महसूल अधिकारी तसेच संबंधित पालिकेतील अधिकारी-कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.

युवराज आघाव यांचा स्तुत्य उपक्रम

युवराज आघाव यांचा स्तुत्य उपक्रम




परळी / सोनपेठ (दर्शन) :-

विमा प्रतिनिधी युवराज रामकिशन आघाव यांच्या वाढदिवसानिर्मित जि.प.प्रा.शाळा वडगांव (दा) ता.परळी वे जि. बीड येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारतीय आयुविमा महामंडळाचे परळी शाखेचे विकास अधिकारी श्री. जय खंडागळे साहेब, तलाठी साहेब श्री. विष्णु गित्ते, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनंत गव्हाणे सर, गावचे मा.सरपंच शिवाजीराव घायाळ, ग्रा.प.सदस्य दत्ता होळकर, सुदर्शन मुंडे, वाल्मिक खाटीक, गणेश काटकर, राजेभाऊ शिंदे, नामदेव डोणे, श्रीमती सुकूटलावार मॅडम, जाधव मॅडम, कळसकर मॅडम, बहीरवाड मॅडम, गावातील जेष्ठ नागरीक बालासाहेब जाधव, मल्हार दर्शनचे संपादक एन. के. अप्पा व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते..

Tuesday, August 17, 2021

माणसाची किंमत ; चारित्र्य आणि सेवाभाव हे अत्युच्च व्यावसायिक यश देतात...

माणसाची किंमत ; चारित्र्य आणि सेवाभाव हे अत्युच्च व्यावसायिक यश देतात... 
         🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀


सोनपेठ (दर्शन) :-

                 अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

 ‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का?’ त्या म्हाताऱ्या आजिबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

 ‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रुम शिल्लक नाही.’ त्या निग्रो तरुणाने सांगीतले, पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणुकाही त्याचा अपराध असावा.

 ‘बघाना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल.’ म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खीशात घालावेत, असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

 ‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे, पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात...  तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला, आणि आपली खोली साफ करायला निघुन गेला.

 थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला, तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजुड बॅग काढत असतातना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला. ‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

 ‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

 ‘तू कोठे झोपणार?’ त्या आजिबाईंनी विचारले.

 ‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

 आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती, पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालु करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

 दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते. ‘किती पैसे झाले?’ त्या आजोबांनी विचारले.

 ‘पैशांचे आपण नंतर बघु. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.’ असे सांगुन तो निग्रो तरुण पॅन्ट्रिमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

 ‘किती पैसे द्यायचे?’ त्या म्हातारबुवांनी ब्रेक फास्ट झाल्यावर विचारले.

 ‘त्याचे असे आहे, मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत.’ तो निग्रो तरुण म्हणाला.

 ‘असे कसे? बरं, मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

 ‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहीले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते, तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाश्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडुन पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

 तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातुन काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्ल्यात टाकु लागला.

 म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी जो चहा घेतला होता, आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

 ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकित आणुन ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो.’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही वाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरुन आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

 ‘हे पहा, आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत.आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का?’ आजोबांनी विचारले.

 थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल.’ म्हातारबुवांनी बघीतले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या. त्या आजिबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे.’

 ‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही. कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या!’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातून हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

 पंधरा दिवस असेच गेले, आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघीतला. ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकीत होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची ईच्छा असायची.

 ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे, म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच.

 त्याला चक्क इंटरव्ह्युचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्युला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

 तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्हुला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली, तरी पुष्कळ झाले, असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इन्टरव्ह्युचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की, हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत.

 त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिममध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच. चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

 ‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नि लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत.’ ते आजोबा म्हणाले.

 ‘त्या दिवशी रात्री तु आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस, त्यामुळे आम्ही भारावुन गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही.’ आजीबाई म्हणाल्या.

 ‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तु आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का?’ ओ किफे साहेब म्हणाले.

 ‘जनरल मॅनेजर?’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण--- ‘

 ‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे.’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले, ‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारचे शिक्षण घेता आले नाही, हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही, हे पण आम्हाला समजते. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो.

 त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो. त्यात तू उत्तम मार्काने पास झाला. जेव्हा तू आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातून हॉटेलच्या गल्यात टाकलेस, तेव्हाच आमच्या लक्षात आले की, तू नुसताच प्रामाणीक माणुस नाहीस, तर ऊत्तम कॅरॅक्टर असलेला माणुस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणुन तुझे स्वागत असो!’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.
                     🌀🌀🌀🏵🌀🌀🌀 

Sunday, August 15, 2021

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित

परळीचा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित

दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात सहकुटुंब सौरभ चे अभिनंदन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी डावीकडून सर्वेश नावंदे, कविता नावंदे, रुतुजा नावंदे, सुभाष नावंदे युवा क्रिकेटपटू भुषण भीमाशंकर नावंदे दिसत आहेत.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते  राष्ट्रीय युवा पुरस्कार स्वीकारताना सौरभ नावंदे या वेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडण्ड दिसत आहेत.

परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन) :-

   देशातील युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी मूळचा परचुंडी ता परळी येथील व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सौरभ नावंदे याला सन 2017-18 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने केंद्रीय कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक व कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सन 2017-18 व 2018-19 च्या राष्ट्रीय युवा पुरष्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्रालय सचिव उषा शर्मा व संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतातील निवासी समन्वय डियर्ड बायोडड उपस्थित होत्या.
    या कार्यक्रमात सन 2017-18 साठी 14  व 2018-19 साठी 8अशा 22 पुरस्काराचे वितरण करण्यात आले यात सौरभला सन 2017-18 च्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने रु एक लाख ,पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
      सौरभ नावंदे याने 2017 मध्ये  क्वालालंपूर येथे आयोजित ’राष्ट्र मंडल युवा शिखर संमेलनात’ आणि 2018 मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित ’संयुक्त राष्ट्र सभेत’ भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याला महाराष्ट्र शासनानेही यापूर्वी युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 दरम्यान महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सौरभचे अभिनंदन केले.तसेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा धनंजय मुंडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खा.प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेकांनी  सौरभचे अभिनंदन केले.
सौरभ हा सेवानिवृत्त क्रीडाधिकारी सुभाष नावंदे व  औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांचा मुलगा असून, प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे ,सामजिक कार्यकर्ते रामलिंगआप्पा नावंदे यांचा तो पुतण्या आहे.सौरभला या राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित  करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण   


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीमती गोयल यांनी परिधान केलेल्या आकर्षक फेट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 
        पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचीही पालकत्वाची जबाबदारी असल्याने ते ध्वजारोहणासाठी यावेळी परभणीला येऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, आमदार राहुल पाटील, आमदार, मेघना बोर्डीकर जि.प.चे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जयंत मीना आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी संबोधित केले.

Friday, August 13, 2021

पाथरी विधानसभा मतदारसंघातील रुग्णांसाठी दुर्धर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर !

पाथरी विधानसभा मतदारसंघातील रुग्णांसाठी दुर्धर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर !


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या वतीने पाथरी विधानसभा मतदार संघातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.कॅन्सर, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, पोटाच्या शस्त्रक्रिया, हीप रीप्लेसमेंट, गुडघे प्रत्यारोपण, डोळ्याचे ऑपरेशन, बोण मॅरो, लिव्हर प्रत्यारोपण, कानाची शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आशा विविध प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.या सर्व शस्त्रक्रिया मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, कंबाला हॉस्पिटल, मशिना हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, नूर हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, हॉली फॅमिली हॉस्पिटल, अंबानी हॉस्पिटल, के ई एम हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल, अलिदाबेद हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, प्रिन्स अली खान हॉस्पिटल या हॉस्पिटल्स मध्ये करण्यात येणार आहेत.त्यामुळे मतदार संघातील जे रुग्ण वरील पैकी कुठल्याही आजाराने ग्रस्त असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.संपर्कासाठी मोबाईल नंबर :-अमोल कदम : 9420282428 , 8888622326.

Saturday, August 7, 2021

सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजींचा वयाच्या ९४ व्या वर्षीही सायकलवरून प्रवास

सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजींचा वयाच्या ९४ व्या वर्षीही सायकलवरून प्रवास




वडवणी / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

वयाची ९४ वर्ष सरली तरीही तीच उमेद कायम ठेवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम वाघमारे गुरुजींचा अजूनही सायकल प्रवास सुरू आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड गावचे मुळ रहिवासी असणारे आणि सध्या वडवणी या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त हेडमास्तर श्रीराम जानोजीराव वाघमारे हे वयाने ९४ वर्षांचे आहेत. आजही ते तंदुरूस्त असून शहरांमधील दैनंदिन जीवनात लागणा-या वस्तू आनण्यासाठी सर्रास सायकलचा वापर करतात.
शिक्षण विभागातुन १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले आहेत.वडवणी शहरातील जनमानसांच्या नजरा आपोआप त्यांच्या कडे जातात..सतत सायकलवरून प्रवास करताना शहरातील नागरिक त्यांच्याकडे कुतुहलाने बघत असतात.सध्या देशात, महाराष्ट्र राज्यात आणि जिल्ह्यांत कोरोनाची भयानक परिस्थिती असताना आपण पाहतो आहोत.शासनाने वेळेचे बंधन केल्याने अनेक जेष्ठ नागरिक आपल्या नियमित व्यायामा पासुन  दुर दुर गेले.. अनेकांना व्यायाम करणे अवघड झाल्याने मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले.असे एक अनेक उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहिले आहेत.मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता वाघमारे गुरुजींनी आपल्या आवडी जोपासल्या आणि शासकीय नियमांचे पालन करुन जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील सायकल प्रवासही केला.त्यांनी याबाबत आपले अनुभव देखील व्यक्त केले.ते म्हणाले की,मी आज वयाने ९४ वर्षाचा आहे.सेवानिवृत झालो त्याकाळी एक आवडीचे वाहन म्हणून सायकल घेतली.माझे सर्व दैनंदिन कामे आजही मी सायकलवरून प्रवास करून करतो आहे.त्यामुळे माझं शरीर देखील सदृढ राहते आणि प्रकृती सुध्दा तंदुरुस्त राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सावता माळी हे प्रपंचातून देवत्व मिळवणारे एकमेव संत - ह.भ.प.रोहीदास मस्के गंगाखेडला पुण्यतीथी ऊत्साहात साजरी

सावता माळी हे प्रपंचातून देवत्व मिळवणारे एकमेव संत - ह.भ.प.रोहीदास मस्के
गंगाखेडला पुण्यतीथी ऊत्साहात साजरी




गंगाखेड / सोनपेठ (दर्शन): -

परमार्थातून देवत्व प्राप्त केलेले अनेक साधू-संत आहेत. परंतू आपल्या  व्यवसायातून भक्तीयोग साधत देवत्व प्राप्त केलेले सावता माळी हे एकमेव संत होत. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रामकथाकार ह. भ. प. रोहिदास मस्के महाराज यांनी केले. गंगाखेड येथे माळी समाजाच्या वतीने आयोजीत संत सावतामाळी पुण्यतीथी कार्यक्रमात ते बोलत होते. 
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गत वर्षीचा पुण्यातीथी कार्यक्रम रद्द झाला होता. या वर्षी कोरोना नियमांचे नियम पाळत हा कार्यक्रम खडकपूरा गल्लीत घेण्यात आला. मर्यादीत ऊपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ह. भ. प. नामदेव महाराज रेंगे व ह. भ. प. रोहिदास महाराज मस्के यांचे किर्तन झाले. या प्रसंगी बोलताना रोहिदास मस्के यांनी भक्ती करत असतानाही आपापले कार्य करत राहणे आवश्यक असल्याचे सांगीतले. संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत गोरोबा कुंभार या सर्व संतांची ऊदाहरणे त्यांनी दिली. 
ईतर सर्व संत पंढरपूर वारी करतात परंतू सावता माळी एकदाही पंढरपूरास गेले नाहीत. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. लसून मिरची कोथींबीरी अवघा झाला माझा हरी’ असे अभंग करत आपल्या शेतातच त्यांनी भक्तीचा मळा फुलवला. यामुळेच विठ्ठल स्वतः त्यांना भेटायला आरण गावात आले. यावरूनच सावता माळी यांची महती सिद्ध होते. आपणही सर्वांना आपापल्या कार्याशी प्रामाणिक राहून भक्ती करणे योग्य असल्याचा निर्वाळा यावेळी ह. भ. प. मस्के यांनी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील सर्व युवक, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु राहणार:सीईओ शिवानंद टाकसाळे

जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु राहणार:सीईओ शिवानंद टाकसाळे



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्याकरिता यापूर्वी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात सुधारणा करुन जिल्हा परिषादेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेंतर्गत सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने (100 टक्के) उपस्थितीसह सुरु राहतील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेंतर्गत सर्व विभागाच्या कार्यालयांमधून अधिकारी कर्मचार्‍यांची 100 टक्के उपस्थिती राहणार असे चित्र स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु राहणार:सीईओ शिवानंद टाकसाळे

जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु राहणार:सीईओ शिवानंद टाकसाळे


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्याकरिता यापूर्वी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात सुधारणा करुन जिल्हा परिषादेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेंतर्गत सर्व कार्यालय पूर्ण क्षमतेने (100 टक्के) उपस्थितीसह सुरु राहतील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेंतर्गत सर्व विभागाच्या कार्यालयांमधून अधिकारी कर्मचार्‍यांची 100 टक्के उपस्थिती राहणार असे चित्र स्पष्ट होत आहे.

Friday, August 6, 2021

रानभाज्या महोत्सवाचे परभणी येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजन

रानभाज्या महोत्सवाचे परभणी येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता माहिती तंत्रज्ञान केंद्रासमोरील काळ्या कमानीजवळ रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परभणी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाज्या महोत्सवास भेट द्यावी. असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी केले आहे.
 रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक, जीवनसत्वे व खनिजे असतात. रानभाज्या या औषधी गुणधर्माबाबत परिपुर्ण असतात. रानभाजीला कोणतीही फवारणी, खताचा वापराशिवाय नैसर्गिकरीत्या उगवलेल्या असल्याने त्या विषमुक्त असतात. अशा विविध भाज्यांची शहरी ग्राहकांना ओळख व्हावी, आहारातील त्यांचे महत्व पटावे व खरेदीस उपलब्ध व्हाव्यात याअनुषंगाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.असेही कळविण्यात आले आहे.

Thursday, August 5, 2021

राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
       शुक्रवार दि.6ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठकीसाठी राखीव. सायंकाळी 06.05 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृहात राखीव व मुक्काम करतील.
शनिवार दि.7 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह येथून प्रशासकीय इमारतीकडे प्रयाण. सकाळी 09.05 वाजता आगमन व वसंतराव नाईक आणि भगवान सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करतील. सकाळी 9.12 ते 9.17 वाजेपर्यंत विद्यापीठातील बांबू प्रात्यक्षिक प्लॉटला भेटीसाठी राखीव. सकाळी 09.19 ते 09.50 वाजेपर्यंत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पास भेट. सकाळी 9.52 ते 10.02 वाजेपर्यंत अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उष्मायन केंद्राला भेट देण्यासाठी आणि तरुण उद्योजकांशी संवाद साधतील.  सकाळी 10.02 वाजता अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून प्रयाण. सकाळी 10.04 ते 10.14 वाजेदरम्यान मुलींचे वस्तीगृह, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथे आगमन व विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.  सकाळी 10.16 ते 10.26 वाजेपर्यंत ग्रंथालय वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथे आगमन व वृक्षारोपणासाठी राखीव. सकाळी 10.28 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहाकडे प्रयाण करतील.सकाळी 10.28 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठाचा अहवाल सादर करणे, विद्यापीठाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या व्हिडिओ फिल्मचे प्रदर्शन, विद्यापीठाच्या हरित चळवळीचा व्हिडिओ फिल्म प्रदर्शित व प्राध्यापकांशी संवाद साधतील. दुपारी 12 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृह येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 12.02 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह,वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.

जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू

जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पदभार घेतल्यानंतर मा. राज्यपाल महोदयांच्या दौऱ्या निमित्त विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. 
 2014 साली आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. अकोल्या जिल्हयात 2015-16 मधे त्यांनी परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. केंद्र शासनाच्या पेट्रोलीयम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य केले. 
पहिली नियुक्ती नोव्हेंबर 2016 पासून पालघर जिल्हयात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मे 2018 पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
 परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्यानी सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या.
श्रीमती आंचल गोयल यांचा जन्म पंजाब राज्यात दिनांक 1 जुलै 1990 रोजी झाला आहे. त्यांचे शिक्षण चंदीगड येथे बीई ईलेक्टॉनिक्स पदवी सन 2012 मध्ये मिळविली आहे. सन 2013 मध्ये आयकर विभागात निवड झाली होती. आई वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 

Tuesday, August 3, 2021

आंचल गोयल यांनी आजच स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

आंचल गोयल यांनी आजच स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांनी मंगळवारी (दि.03) सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 13 जुलै अप्पर मुख्य सचिव यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि.03 ऑगस्ट रोजी सह सचिवांनी दिलेल्या पत्राच्या संदर्भाने आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी परभणी या पदाचा पदभार स्विकारला आहे,असे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्राद्वारे नमूद केले आहे.