सोनपेठ नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात शहराचा खरा विकास साधण्याचा प्रयत्न - नगराध्यक्ष परमेश्वर कदम विशेष सभेत सादर केला करवाढमुक्त पण विकासयुक्त अर्थसंकल्प !!
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ नगर परिषद निवडणूकीनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प ; कोणतीही करवाढ नाही, सर्वसमावेशक विकासाचा सोनपेठ वासियांना दिला विश्वास ! 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर,
सोनपेठ नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांचा अर्थसंकल्प शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून शहरातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे बैठकीला नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी युवराज पौळ, उपनगराध्यक्ष निलेश राठोड, गट नेते सद्दाम हुसेन, गट नेते सारिका विटेकर, धम्मपाल किरवले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांच्या या अर्थसंकल्पातून शहराच्या कायापालटासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि शहराअंतर्गत रस्त्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे, "नगर परिषदेच्या वाचनालयासाठी नवीन पुस्तक खरेदीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे", अनावश्यक खर्चांना फाटा देण्यात आलेला आहे तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारांचे जाळे विस्तारले जाणार आहे.
‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ घनकचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यावर भर दिला आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारानुसार प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि मुबलक पाणी पोहोचवण्यासाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी निधी प्रस्तावित आहे. स्वच्छ पाणी देण्यासाठी विशेष तरतूद केल्यामुळे यापुढे शहराला अधिक स्वच्छ पाणी मिळणार आहे. नागरिकांच्या मनोरंजनासाठी सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरण करण्यासही प्राधान्य दिले आहे.
मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी अर्थसंकल्पातील तांत्रिक बाजू आणि जमा-खर्चाचा तपशील मांडत शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा अर्थसंकल्प शहराच्या प्रगतीचा ठरणार असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याने नागरिकांमधून सुध्दा समाधान व्यक्त होत आहे.
शहराचा खरा विकास साधण्याचा प्रयत्न - नगराध्यक्ष परमेश्वर कदम - हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असून, कोणत्याही नवीन कराचा बोजा न टाकता शहराचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे सोनपेठ च्या जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी नगरपालिकेच्या एक ना एक रुपयाचा विनियोग जनकल्याणासाठीच व्हावा असा आपला निर्धार आणि संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले*
*सर्वांच्या सहकार्याने सोनपेठ नगरपरिषद अधिक सक्षम, समृद्ध व महाराष्ट्रात अव्वल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी खेचून आणून सोनपेठ शहराला आदर्श शहर बनवू, असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी यावेळी व्यक्त केला*.
No comments:
Post a Comment