जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्याचे जेईई मुख्य परीक्षेत यश
सोनपेठ (दर्शन) :- जेईई या भारतातील आयआयटी, एनआयटीएस सरकारी आणि इतर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी , राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NIA) द्वारा घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत , जिजामाता पब्लिक स्कूल चा माजी विद्यार्थी उत्कर्ष रामेश्वर जाधव याने 99. 82 सर्वोच्च गुण प्राप्त केले. या या परीक्षेमध्ये अनिवार्य असलेल्या विषयापैकी फिजिक्स 99.82, केमिस्ट्री 99.92 व मॅथ 98.80 असे सर्वोच्च गुण प्राप्त केले . सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे सचिव, प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे , परभणी जिल्हा परिषद सदस्या, सौ विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे, शाळेचे प्राचार्य, मोहम्मद झहीर , प्राचार्य डॉ.गणेश जयंतपाळ , सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment