आज खासदार असदुद्दीन ओवैसी परभणीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात करणार मार्गदर्शन
परभणी/सोनपेठ (दर्शन) :- ऑल इंडिया मजलीस - ए - इत्तेहादूल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज रविवारी (दि. २९) परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून जलसा - ए- आम या मेळाव्यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झेन यांनी दिली.शहरातील धार रस्त्यावरील गोल्डन फंक्शन हॉल येथे सायंकाळी ७ वाजता जलसा ए आम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी, माजी खासदार इम्तियाज जलील हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.मागील काही दिवसांपूर्वी पक्षाने मोहम्मद गौस झेन यांची पक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी निवड केली. त्यानंतर पक्षाची जिल्हा कार्यकारणी अजून स्थापन व्हायचे आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी ही महत्त्वाची बैठक व संवाद होत असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झेन यांनी दिली.या मेळाव्यास कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस सेन यांनी केले आहे
__________