जिजामाता पब्लिक स्कूल येथे पालक मेळावा व फौंडेशन, NEET, JEE व CET क्लासेसचे उद्घाटन
सोनपेठ (दर्शन) : - दि १२/ ४/२०२४ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच, भविष्यातील करिअरच्या संधी, आणि आव्हानांची पूर्वतयारी या अनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने आज जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज सोनपेठ येथे पालक मेळावा व नीट जेई सीईटी , सहावी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लास च्या तयारीसाठी जिजामाता Neet , JEE CET अकॅडमी चे उद्घाटन संपन्न झाले
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोनपेठ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थी प्रिय पोलीस उपनिरीक्षक मा. विनोद चव्हाण साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. बाबुरावजी धोंडगे भाऊ , ( अध्यक्ष जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज सोनपेठ ). शाळेचे सचिव मा. प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे सर, शाळेचे प्राचार्य हे जे अजय सर, सहशिक्षिका, अश्विनी चव्हाण मॅडम, तसेच नीट जेई अकॅडमीचे तज्ञ शिक्षक, प्रा. मुकेश कुमार सरBiology (बिहार) , प्रा. जहीर सर chemistry ( हैदराबाद), प्रा. राहुल राजपूत सर physics ( उत्तर प्रदेश ) , प्रा. जीवन भोसले सर Maths तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पुरुष व महिला पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत असताना शाळेचे प्राचार्य अजय सर यांनी शाळा आणि पालक यातील संवाद , विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील व्यावसायिक संधी पुढील वर्षा संदर्भात शाळेचे नियोजन याविषयी चर्चा केली. पालकांना मार्गदर्शन करताना " सोनपेठ सारख्या ग्रामीण भागात नीट आणि जे ई परीक्षेच्या तयारीसाठी जिजामाता पब्लिक स्कूल ने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त पालकांनी उपयोग करावा, यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील ," असे मत प्रमुख अतिथी मा विनोद चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे सचिव प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे सर यांनी " सोनपेठ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लातूर नांदेड सारख्या शैक्षणिक सुविधा जिजामाता पब्लिक स्कूलच्या माध्यमातून याच ठिकाणी उपलब्ध करून गुणवत्तेचा उच्चांक, दर्जेदार शिक्षण, व आधुनिक शैक्षणिक सुविधा याच ठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जे ई व सीईटीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लास ची सुरुवात झालेली आहे . व येत्या एक मे पासून सहावी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लास सुरू होत आहेत. सोनपेठ व परिसरातील विद्यार्थ्यांना यापुढे लातूर नांदेड च्या ऐवजी याच ठिकाणी राहून अकरावी व बारावीच्या नीट जेई परीक्षेची पूर्वतयारी करता येणार आहे. परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची शैक्षणिक सुविधा जिजामाता अकॅडमी फाउंडेशन क्लास च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सोनपेठ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना याच ठिकाणी राहून आपले डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याची स्वप्न पूर्ण करता येणार आहे तरी जास्तीत जास्त पालकांनी सहावी ते दहावीपर्यंत असलेल्या फाउंडेशन क्लास व अकरावी बारावी साठी असलेल्या नीट जेईच्या सुविधेचा लाभ घेण्यासंदर्भात पालकांनीही उत्साह पूर्ण प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश जयतपाळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका अश्विनी चव्हाण मॅडम यांनी केले.
No comments:
Post a Comment