सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठची व्यापारपेठ एकेकाळी खूप मोठी व्यापार पेठ म्हणून प्रसिद्ध होती. दररोज लाखो रुपयांची उलाढाल मार्केटमध्ये होत होती. परंतु या बाजारपेठेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ऑनलाइनच्या जमान्यात नागरिकांचा कल दिवसेंदिवस ऑनलाइन खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फटका सोनपेठच्या व्यापार पेठेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. येथील व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे. मोठे आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळत आहे. सोनपेठ शहरातील व परिसरातील सुज्ञ नागरिकांनी ऑनलाईन वस्तू खरेदी ऐवजी आपल्या सोनपेठ बाजारपेठेत जाऊन वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन माजी नगरसेवक तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमर वरकड यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी नगरसेवक तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमर वरकड यांनी म्हटले आहे की, सोनपेठची बाजारपेठ एकेकाळी प्रचंड गजबजलेली असायची दररोज लाखो रुपयांची उलाढाल या व्यापार पेठेत होत होती.परंतु दिवसेंदिवस ऑनलाइन खरेदी करण्याचे फॅड नागरिकात निर्माण झाल्याने सोनपेठच्या मार्केटवर मोठा परिणाम निर्माण झाला. परिणामी व्यापारी बांधवांचा धंदा मंदावल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन खरेदी टाळून आपली बाजारपेठ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण सोनपेठचा व्यापारी अतीघाईच्या वेळी रात्री-अपरात्री दुकान उघडून मदत करत असतो.आपल्या सुख-दुः खात सहभागी होणारा, वेळेला मदतीला धावुन येणारा कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या वेळी ऑनलाईन सेवा बंद असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांना सेवा देणारा आपला स्थानिक दुकानदारच होता.म्हणूनच कुटुंबा समवेत बाहेर पडा, बाजारपेठांमध्ये खरेदी करा, शहरातील बाजारपेठा मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करा, ऑनलाईन खरेदी करु नका असे आवाहन अमर वरकड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment