Friday, October 25, 2024

माझे सर्वागीण आदर्श प्रा किरण सोनटक्के सर - प्रा विलास माधवराव साखरे


खरोखर आज माझ्या जीवनाला एक नविन वळण, ऊर्जा, सन्मान समाजात मिळतोय. त्यांचे सर्व श्रेय केवळ प्रा किरण सोनटक्के सर यांना जाते. मी आज शैक्षणिक, सामाजिक, आणि औद्येगिक क्षेत्रात कार्यरत आहे ते प्रा किरण सोनटक्के सर यांचा मुळेच. माझे बालपण व शिक्षण हे मामाच्या गावी म्हणजे मांडाखळी येथे झाले. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. खूप आनंद झाला. पण पुढील शिक्षणासाठी पुढे कुठे जावे हा प्रश्न मनामध्ये भेडसावत होता. तेव्हा याच गावातील विद्यार्थीचे महाविद्यालयीन शिक्षण गावातच घेता यावे यासाठी किरण सरांनी मांडाखळी येथे "संताई कनिष्ठ महाविद्यालयाची" स्थापना केली होती. याच महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी मी जून 2007मध्ये प्रवेश घेतला आणि पाहता पाहता येथील शिक्षणात रममाण झालो.
             येथूनच माझ्या जीवनाला कलाटणी मिळण्यास सुरुवात झाली.महाविद्यालयाची शिस्त खूपच कडक होती. दर्जदार शिक्षण यामुळे मला अभ्यास करण्याची सवय जडली. अकरावीत असताना एका कार्यक्रमात प्रा किरण सर हे प्रमुख पाहुणे म्हणून अले होते. त्यावेळी मला माझे भाषण करायचे होते. तेव्हाच मी अडखळत होतो. त्यावेळी किरण सर आपल्या मनोगतातून माझा उलेख करून म्हणाले, कोणतेही काम हे न घाबरता करावे. आपण आपल्या आईच्या पोटातून शिकून आलेलो नसतो. ते सर्व आपल्याला निर्माण करायच असत! तेव्हा निर्भिडपना  हा गुण मी अंगिकारला. पुढे मोठा धाडसाने भाषण करायला लागलो. तर अश्या प्रकारे सरांच्या सानिध्यात येऊन मी केवळ अभ्यासातच पुढे न जाता वकृत्व, खेळ,कला,क्रीडा या क्षेत्रात प्रथम राहिलो. सराकडून मला बारावीला एक महत्त्वाचा गुण शिकण्यास मिळाला. तो म्हणजे, "बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले". म्हणजे सरांनी आपल्या मनोगतातून एक शब्द दिला होता की, ' विद्यार्थि मित्रांनो तुम्हाला परीक्षा देण्यासाठी बाहेर जावे लागते. तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. मी तुम्हाला सहा महिन्यांत परीक्षा केंद्र मांडाखळीलां स्वतच्या इमारतीत उपलब्ध करून देतो! मग काय अवघ्या सहा महिन्यांत इमारत व परीक्षा केंद्र आम्हाला गावातच प्राप्त झाले. बाहेरगावी जाण्याचा त्रास कमी झाला.
      किरण सरांच्या मार्गदर्शनामुळे व सहवासामुळे मी बारावीला मेरिटमध्ये आलो. पुढील शिक्षणासाठी सुप्रसिद्ध अशा नाशिक शहरात मला शासकीय महाविद्यालयात डी. टी. एड. साठी प्रवेश मिळाला. किरण सरांच्या ज्ञानाची व संस्काराची शिदोरी घेऊन मी नाशिकला निघालो. सरांनी दिलेले संस्कार, ज्ञान, निर्भिडपना हे कौशल्य खूप उपयोगी पडले. काय मग डी. टी. एड. ची पदविका मोठ्या गुणांनी पास करून शिक्षकांची पदवी मिळवली. पुढील नौकरीसाठी मी सरांच्या मार्गदर्शनात आलो. किरण सरानाही आनंद झाला. तेमला म्हणाले, 'बाळू पुढे आता काय करतो? तुला शहरातील नामंकित शाळेत संधी उपलब्ध करून देतो.' माझ्या घरच्यांचां विचार घेऊन सरानी मराठवाडा हायस्कूल या शाळेत शिक्षक पदासाठी माझे नाव दिले. त्या ठिकाणी माझी निवडसुद्धा करण्यात आली. पण मी ती संधी कोणताही विचार न करता डावलाली. त्यावेळी गुरूला नकार देणे म्हणजे काळजावर दगड ठेवणे होते. हा निर्णय घेतांना स्तब्ध झालो होतो.
      परंतु मला विश्वास होता की, सरांची माया, प्रेम,जिव्हाळा, माझ्यावर कायम राहील आणि तो कायम होता. तेव्हा सरांनी मला विचारले,' का बरं संधी सोडतोयस? तेव्हा मी सराना सांगितले, "सर मला तुमच्यासारखे काही तरी वेगळे बनायचे आहे.! तेव्हा सरांनी थोडी ही नाराजगी न दाखवता, ठीक आहे! तुला जे व्हायचे आहे ते व्हो, मी तुझ्या सोबत आहे! असे म्हणून मला पाठबळ दिले. सरांनी माझ्यात असलेले सर्व गुण ओळखले होते. मग मी पण ठरवले की आपण पण सरासारखे निर्भिड, सृजनशील, दिशादर्शक संस्थाद्यक्ष व्हायचे. मी एक ' बालशिवराय गुरूकुल ' नावाचे वसतिगृह चालू केले. तेव्हा मला सरांनी दोन दोन तास वसतिगृहविषयी मार्गदर्शन केले. मग काय मी लागलो कामाला. मेहनत, जिद्दीचे जोरावर आणि सरांच्या मार्गदर्शनातून काम करत यशस्वी गुरुकुल चालक झालो.
         असेच बोलत असताना मित्रासोबत गावाकडे इंग्लिश स्कूल काढण्याचा प्रस्ताव सरांकडे मांडला. तेंव्हा लगेच सरांचा प्रतिसाद मिळाला.."खूप छान! ग्रामीण भागात शिक्षण खूप गरजेचे आहे. आणि ते ध्येय तू पूर्ण करशील. त्या साठी माझा तुला तन, मन, धनानी पाठिंबा राहील! हे करण्याची इच्छा असेल तर तुला मान्यता देखील मिळून देण्यास मदत करतो. मग काय मी लागलो कामाला, आणि मोठ्या उत्साहाने उजळआंबा येथे "स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल " ची स्थापना केली. शाळेचे उद्गतान किरण सर चे हाताने केले. नंतर कोरोना महामारी या रोगाने सर्वत्र थैमान घातले असता शाळा,हॉस्टेल एक वर्ष बंद राहिले. या काळात देखील गप्प बसू वाटणं गेले तेव्हा माझ्या शेतीतून हायवे रोड गेला होता. तेव्हा किरण सराना बोलून एक शुद्ध शाकाहारी, "वसंत विलास फॅमिली रेस्टॉरंट" ची स्थापना केली. आणि कमी कालावधीत च संपूर्ण जिल्ह्यात हे रेस्टॉरंट नावारूपाला आले.या सर्व माझ्या यशात महत्त्वाचे योगदान आहे ते केवळ किरण सरांचे. त्यांनी माझ्यासाठी केलेली धडपड,मार्गदर्शन, प्रेम सहकार्य हे माझ्यासाठी एखाद्या शासकीय अधिकर्यापेक्षा मोठा सन्मान आहे. त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही.
    प्रा किरण सर यांनी ज्ञानसाधना प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची स्थापना "2002माध्ये केली होती आज 22वर्षाच्या कार्यकाळात नर्सरी ते  पि. जि. पर्यंत च वटवृक्ष झाला आहे. आज आज या संस्थेमध्ये 5000 मुले शिक्षण घेत आहेत. 350 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे.
       आजमितीस मला आवरजून सांगावसे वाटते की, किरण सरने शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील आपला ठसा संपूर्ण मराठवाड्यात उमटवला आहे. त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध प्रकारचे पदाचे अध्यक्ष पद भूषविले आहे. शहराध्यक्ष, जिल्हाकार्याध्यक्ष, इत्यादी पदाला न्याय देऊन समाजात उत्तम काम केले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून सरांची नुकतीच राष्ट्रवादी शिक्षक सेल चे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आज पूर्ण मराठवाडातील आठ जील्याचे नेतृत्व ते करत आहे. आणि शिक्षकांच्या विविध प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर आहे..
            सरांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. अनेक मुले शिक्षनसाठी दत्तक घेतली आहे. तरीही प्रसिद्धीसाठी खूप दूर राहिले. हाच गुण मला खूप काही शिकवणारां आहे. आज सरांचे हजारो विद्यार्थी सर्व क्षेत्रात डॉक्टर, इंजिनियर, जिल्हाधिकारी, शिक्षक, पोलीस, तहसीलदार, व्यवसिक संस्थाद्यक्ष झाले. महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या शासकीय सेवेत रुजू झाले. हीच सर्वात त्यांची मोठी कमाई आहे. ही केवळ पैशात मिळत नाही. 
     आदरणीय सरांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपली मोठी ओळख निर्माण केली. ही गोष्ट देखील आमच्यासाठी खूप काही सांगून जाते. असे आमचे सर्वगुण संपन्न गुरू आम्हाला मिळाले त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझे संपूर्ण आयुष्य त्यांना लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. किरण सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!.
संकलन - प्रा.विलास माधवराव साखरे 
अध्यक्ष - विवेकानंद सेवाभावी संस्था, उजळआंबा.
संचालक - वसंत विलास फॅमिली रेस्टॉरंट,उजळआंबा.

No comments:

Post a Comment