Tuesday, June 25, 2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज 

हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शैक्षणिक कार्य

संपादन

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 

शैक्षणिक वसतिगृहे

संपादन

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लिम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरुकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

Monday, June 17, 2024

व्हॉईस ऑफ मीडियाच्या बैठकीत शैक्षणिक किटचे वाटप,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची फेरनियुक्ती तर वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मारोती जुंबडे

परभणी/सोनपेठ (दर्शन) : - 

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हा आढावा बैठक परभणी शहरात सोमवार, दि.१७ जून रोजी पार पडली. या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तसेच आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी मारोती जुंबडे यांची निवड करण्यात आली. यावेळी गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची आढावा बैठक मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनेच्या मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती देण्यात आली. पत्रकारांच्या आरोग्याच्या सेवेसाठी वैद्यकीय कक्ष स्थापन केला असून वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी मारोती जुंबडे यांची या बैठकीत निवड करण्यात आली. लवकरच या कक्षाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांच्या आरोग्य बाबत माहिती संकलित करून त्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले जाणार आहे. त्यासोबतच परभणी मेडिकल कॉलेज यांचे देखील ओळखपत्र दिले जाणार असून त्या माध्यमातून सवलतीच्या दारामध्ये परभणी मेडिकल कॉलेज येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाभरातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य असलेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जाणार असून यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांची सर्व माहिती संकलित करून गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शिकवणी शुल्कामध्ये मदत केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक साहित्य व इतर समस्या संदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया कडून मदत दिली जाणार आहे अशी माहिती या बैठकीत चोरडिया यांनी दिली.
आगामी काळात पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटी निर्मितीवर भर दिला जाणार आहे. तसेच जुलै महिन्यामध्ये जिल्हास्तरीय व्हॉईस ऑफ मीडियाचा मेळावा घेऊन या मेळाव्यात आरोग्य विमा कार्ड वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया शैक्षणिक समितीच्या वतीने १५ गरजू पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

गजानन देशमुख यांची फेरनियुक्ती

व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र मराठवाडाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आले. लवकरच संघटनेची पुनर्बांधणी बांधणी केली जाणार असून तालुका व जिल्हास्तरीय नवीन कार्यकारणीत नवीन चहेऱ्यांना संधी दिली जाणार आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला मुख्य मार्गदर्शक सुरेश जंपनगीरे, मराठवाडा कार्यकारणी उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, सचिव श्रीकांत देशमुख, उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे, मंचक देशमुख, सय्यद युसुफ, विजय कुलकर्णी, बालासाहेब काळे, माणिक रासवे, प्रदीप कांबळे, गणेश लोखंडे, भागवत चव्हाण, लक्ष्मण कच्छवे, नरहरी चौधरी, संतोष गवळी, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा, जिल्हा उपाध्यक्ष किरण स्वामी, कल्याण वाघमारे, प्रदीप गोरशेटे, शिवकिरण शिंदे, दिलीप माघाडे, माबुद खान, किशन इक्कर आदी उपस्थित होते.

Monday, June 10, 2024

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 % पीक विमा मिळुन देणार - आ. सुरेश वरपुडकर

परभणी /सोनपेठ (दर्शन) : -

परभणी येथे दि .10 जुन 2024 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता  जिल्हा अधीक्षक कृषी, परभणी यांच्या कार्यालयात विमा कंपनी च्या प्रतिनिधी व जिल्हा अधीक्षक कृषी यांच्या सोबत बैठक संपन्न झाली, याप्रसंगी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2023 - 24 मधे जिल्ह्यातील 52 मंडळात सलग 21 दिवस पाऊस न पडल्यामुळे बाधित घोषित केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन ला 25 % सरसगट अग्रिम दिला असून उर्वरित 75 % का दिला नाही तसेच कापूस व इतर पिकाचा 100 % विमा का दिला नाही ? 70 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी का रद्द का केल्या ? असा जाब विचारला.त्यावेळी कंपनीच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना या बाबत उत्तर देता आले नाही, त्यामुळे गतवर्षी दुष्काळ असल्यामुळे विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 100 % विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .सरसकट कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन,ऑफलाईन फोनवर तक्रार केली असेल आणि कोणत्या शेतकरी बांधव यांनी पिक विमा भरला आहे आणि यांनी वरच्या कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही यांना पण  खरीप व रबी पिकाचा 100 %  लाभ देण्यात यावा अन्यथा लवकर मार्ग नाही काढला तर आम्ही सर्व जण कोर्टात धाव घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ठामपणे सांगितले याला अधिक्षक कृषी अधिकारी गवळी साहेब यांनी तत्वात: सहमती दिली व कंपनीच्या प्रतिनिधी ना तश्या सूचना दिल्या आहेत.यावेळी आमदार आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब,  प्रा .रामभाऊ घाटगे घाटगे, सोनपेठ कांग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे ,  रंगनाथ भोसले , सचिन जंवजाळ,  सुदर्शन कदम, सुरेश यादव , अशोकराव जाधव परभणी बाजार समितीचे उपसभापती चव्हाण साहेब मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि कल्याण लोहट मांडाखळीकर उपस्थित होते.