वाणीसंगम येथील गोदावरी गंगेत गाळात श्री विष्णू काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातून जवळ असलेले जुने वाणी संगम येथील गोदावरी गंगेत गाळात श्री विष्णू काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली, दररोज सकाळी फिरायला सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील जुने वाणीसंगम येथील गोदावरी गंगा जवळील श्री वाघेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन येत असतात परंतु आज सकाळी 6.30 वाजता खाली गोदावरी गंगेच्या काठी स्वच्छतेसाठी गेले असता हात पाय धुण्यासाठी गंगेत गाळात रुतून बसलेली मुर्ती सोमनाथ काळे यास दिसली त्यांनी भगवान मस्के पाटील यांना सुचना करुन वरी असलेल्या इतर सोबत्यांना फोन लाऊन ही बाब सांगितली, याप्रसंगी नारायण मस्के पाटील, मारोती रंजवे, लक्ष्मीकांत कांदे, माणीक जाधव, गंगाधर मस्के पाटील व इतर श्री सोमेश्वर नगर वासींनी ती गाळात रुतून बसलेली मुर्ती प्रयत्नाची पराकाष्ठा करत बाहेर काढून विधीवत पूजा करून पुष्पहार अर्पण करून धुप बत्ती लावून श्री वाघेश्वर मंदिर शेजारी आनूण स्थापना केली आहे.अशी माहिती साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ आश्रोबा खरात पाटील व कृष्णा मस्के पाटील यांनी दिली, वाणीसंगम येथील गोदावरी गंगेत गाळात श्री विष्णू काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली पाहता पाहता या मुर्ती च्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केलेली दिसुन येते तरी जिल्हा प्रशासनाने या मुर्ती ची पुरातत्व विभागाच्या वतीने तपासणी करून अहवाल जाहीर करण्यात यावा अशी मागणी होत आहे.



No comments:
Post a Comment