सोनपेठ नगर परिषद विरोधात कंत्राटी कामगार बेमुदत उपोषणाला जिल्हाधिकारी कचेरीवर बसले
सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कंत्राटी कामगारांचे सुमारे 5 महिन्या पासुनचे वेतन थकीत आहे. यामुळे कामगारावर आर्थिक संकट ओढवले असुन उपासमारीची वेळ आली आहे.याप्रकरणा बद्दल कामगारांनी रीतसर परभणी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे दाद मागितली यासंदर्भात आयोजित सुनावणीत स्पष्ट झाले कि कंत्राटदार हे कोणतीही जबाबदार घेण्यास तयार नसताना कंत्राटदाराच्या खात्यावर वेतनाची रक्कम पाठवण्यात आली आणि त्याने सदर रक्कम प्रशासनास परत केली आहे.तर एका कंत्राटदाराने 2 महिन्याचे वेतन दिलेलेच नाही, सोनपेठ नगर परिषद प्रशासनातील या प्रकारच्या अनागोंदीमुळे कामगारांना वेतन दिले जात नाही याबद्दल परभणी सरकारी कामगार अधिकारी यांनी कायदेशीर बाबी आणि तरतुदी स्पष्ट केल्यानंतर तात्काळ वेतन अदा करण्यास सुचविल्यानंतर देखील मुख्याधिकारी यांनी कोणतीही पूर्तता केली नाही नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांत असंतोष निर्माण झाला आहे, आपल्या खालील मागण्याबद्दल दाद मागण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी पासून परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.1) सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणारा पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांचे सुमारे 5 महिन्यापासूनचे थकीत येतन तत्काळ अदा करा.2) सोनपेठ नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणी पुरवठा आणि सफाई कामगारांना किमान २ वर्षापासूनची किमान वेतनाची फरक बिले, प्रा फंड, ईएसआय ई कायदेशीर तरतुदींचा लाभ द्यावा.3) सोनपेठ नगर पालिका मधील कंत्राटी व रोजदारी तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करा सर्व क्षेत्रामध्ये तासाच्या कामासाठी दरमहा रुपये 25000 किमान वेतन निश्चित करा, सोनपेठ नगर परिषदामधील सफाई कामगारांना श्रम साफल्य योजने अंतर्गत घरासाठी जागा प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, तसेच घरकूल बांधकामासाठी अनुदान यावे.4) म.न.पा.व न.प. मध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा.5) सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केल्यानुसार किमान वेतन अदा करण्याचे आदेश संबंधितांना द्या स्त्री व पुरुषांना समान वेतन या.तसेच आजतागायत पर्यतचे किमान वेतनाचे एरिअर्स अदा करा.सफाई कामगारांना कायम तसेच कंत्राटी गमबूट, गणवेश, स्वच्छतेचे साहित्य, चपला उपलब्ध करा.आदि मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे, या निवेदनावर कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड देविदास खरात, सोनपेठ नगर परिषद कंत्राटी पाणीपुरवठा व सफाई कर्मचारी विकी रंजवे, बाळू गरुड, नरेंद्र मुंढे, कांता रंजवे, परमेश्वर साळुंके, किशन गोड, सुनील गाडे, रहीम शेख, बाबा शेख, मोसीन शेख, नेहाल अंन्सारी, अभिजीत धबडे व सिकंदर शेख आदींच्या स्वाक्षरी असून आदिजन परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर बेमुदत उपोषणाला बसलेले असून यांच्या या उपोषणाला महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा शेख सलमान, शेख छोटन, साबिर शेख व फिरोज शेख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पत्राद्वारे दिलेला आहे, याप्रकरणी तमाम सोनपेठकरांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.