Tuesday, April 18, 2023

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद


परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन) :-

विविध व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रथमच बीड जिल्हा व्यापारी परिषदेचे आयोजन मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स चे सर्व पदाधिकारी यांच्या  उपस्थितीत दि.23 एप्रिल 2023 रविवार रोजी सकाळी 10.30 वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स चे अध्यक्ष मा.श्री.आदेश पालसिंग छाबडा, कार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स माजी अध्यक्ष मानसिंग पवार, कार्यक्रमाचे मार्गदर्शक मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, सुप्रसिध्द मोटिवेशनल स्पिकर चकोर गांधी, संभाचीनगरचे अर्थतज्ञ  उमेश शर्मा हे मार्केटिंग,सेल्स, कस्टमर सर्विस, अकाउंट,फायनान्स, या विषयावर सर्व व्यापारी बांधवाना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
 यावेळी देशातील साठ वर्षावरील ज्येष्ठ व्यापार्‍यांना इन्कम टॅक्स आधारे शासनाकडून पेन्शन मिळावी, परळी तालुक्यात त्वरीत एमआयडीसी सुरू करून उद्योग व्यवसायांना गती द्यावी, प्रत्येक तालक्यात व्यापारी भवनाची उभारणी करावी, सर्व व्यापार्‍यांच्या विविध मागण्या व अडीअडचणी तातडीने सोडवण्यात याव्या, परळी- बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करून महानगरांना जोडण्यात यावे, वैद्यनाथ मंदिराच्या कॉरिडोअरच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास व्हावा या मागण्या आहेत. तरी सर्व व्यापारी बांधवानी दि. 23 एप्रिल23 रविवार रोजी आप-आपली दुकाने बंद ठेऊन व्यापारी परीषदेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परळी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment