व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध
संपादक किरण स्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथील व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग जिल्हा कार्यालयात सोमवारी (दि.17) सर्वानुमते परभणी जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी,कार्याध्यक्ष कैलास चव्हाण,साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हा कार्यालयाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन यांनी प्रास्ताविक केले तर व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्वानुमते परभणी जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
अध्यक्ष - विवेक मुंदडा,कार्याध्यक्ष - अरुण रणखांबे, परभणी / लक्ष्मण उजागरे, पाथरी, उपाध्यक्ष - संग्राम खेडकर पालम, गोपाळराव लाड मानवत, साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी सोनपेठ, अकबर सिद्दीकी जिंतूर,
सरचिटणीस - रामेश्वर शिंदे, परभणी, सहसरचिटणीस - भूषण मोरे, कोषाध्यक्ष - एस.एन. इलाही, कार्यवाहक - दिलीप बोरूळ, सहकार्यवाहक - मयुर देशमुख, सहसंघटक - देवानंद वाकळे, संघटक - राजेश डागा, के. डी. वर्मा, पांडूरंग अंभुरे, प्रवक्ता - मंदार कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख - सोमनाथ स्वामी, सदस्य - मुजीब शेख, शेख गौसोद्दीन शहाबोद्दीन, नागसेन भेरजे यांची निवड करण्यात आली आहे.
बीड येथे होऊ घातलेल्या विभागीय अधिवेशनास साप्ताहिक विंगच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आगामी काळात परभणी जिल्हयात जास्तीत जास्त साप्ताहिकाच्या संपादकांना सामावून घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.


No comments:
Post a Comment