Saturday, April 22, 2023

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व पक्षीय शेतकरी बचाव पॅनल चा प्रचाराचा शुभारंभ

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व पक्षीय शेतकरी बचाव पॅनल चा प्रचाराचा शुभारंभ



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पाथरी विधानसभा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शेतकरी बचाव पॅनल चा प्रचाराचा शुभारंभ श्री मोंढा मारोती मंदिर येथे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला, यावेळी माजी आमदार व्यंकटराव कदम, रमाकांत जहागीरदार, मुंजाभाऊ धोंडगे, प्रभाकर सिरसाट व इतर जनांनी मार्गदर्शन केले,सर्व पक्षीय शेतकरी बचाव पॅनल उमेदवार सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून प्रमुख उमेदवार मुंजाभाऊ धोंडगे,परमेश्वर कदम,हनुमान जाधव,रावसाहेब मोकाशे,गणेश कदम,प्रल्हाद बचाटे व मव्हाळे शिवाजी हे उमेदवार आहेत,सहकारी संस्था महिला राखीव वैशाली वजीरे,अंजना सोळंके,सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग नंदकिशोर काळे,सहकारी संस्था विमुक्त जाती / भटक्या जमाती विश्वंभर गोरवे,ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण उमेदवार अजयकुमार देशमुख, विठ्ठल सावंत,अनुसूचित जाती / जमाती रणखांबे आत्माराम,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अनिलकुमार रोडे,आडते व व्यापारी मतदारसंघातून लताताई कदम तसेच हमाल व मापाडी मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे असे उमेदवार रिंगणात आहेत.निवडणुक निशाणी कपबशी या चिन्हावर फुल्लीचा ठसा मारुन सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करण्यात आले याप्रसंगी सतीशराव देशमुख,जयप्रकाश बचाटे, सुशील रेवडकर, पंडितराव सावंत,अमोल बचाटे,प्रकाशराव मुळे, रामेश्वर मोकाशे,शामराव परांडे,वैजनाथ धोंडगे,लक्ष्मण भोसले,गुलाबराव ढाकणे,उमाकांत बागवाले,बालासाहेब पवार,मारोती चव्हाण,बालासाहेब घुगे,गणेश सोळंके, प्रेमदास चव्हाण, सुदर्शन कदम, सचिन रोडे व बालासाहेब सोनवणे आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, April 18, 2023

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद


परळी वैजनाथ / सोनपेठ (दर्शन) :-

विविध व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रथमच बीड जिल्हा व्यापारी परिषदेचे आयोजन मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स चे सर्व पदाधिकारी यांच्या  उपस्थितीत दि.23 एप्रिल 2023 रविवार रोजी सकाळी 10.30 वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स चे अध्यक्ष मा.श्री.आदेश पालसिंग छाबडा, कार्यक्रमाचे उद्घाटक मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स माजी अध्यक्ष मानसिंग पवार, कार्यक्रमाचे मार्गदर्शक मराठवाडा चेंअबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, सुप्रसिध्द मोटिवेशनल स्पिकर चकोर गांधी, संभाचीनगरचे अर्थतज्ञ  उमेश शर्मा हे मार्केटिंग,सेल्स, कस्टमर सर्विस, अकाउंट,फायनान्स, या विषयावर सर्व व्यापारी बांधवाना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
 यावेळी देशातील साठ वर्षावरील ज्येष्ठ व्यापार्‍यांना इन्कम टॅक्स आधारे शासनाकडून पेन्शन मिळावी, परळी तालुक्यात त्वरीत एमआयडीसी सुरू करून उद्योग व्यवसायांना गती द्यावी, प्रत्येक तालक्यात व्यापारी भवनाची उभारणी करावी, सर्व व्यापार्‍यांच्या विविध मागण्या व अडीअडचणी तातडीने सोडवण्यात याव्या, परळी- बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करून महानगरांना जोडण्यात यावे, वैद्यनाथ मंदिराच्या कॉरिडोअरच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास व्हावा या मागण्या आहेत. तरी सर्व व्यापारी बांधवानी दि. 23 एप्रिल23 रविवार रोजी आप-आपली दुकाने बंद ठेऊन व्यापारी परीषदेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परळी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, April 17, 2023

व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध संपादक किरण स्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध
संपादक किरण स्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी शहरातील  रामकृष्ण नगर येथील  व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग जिल्हा कार्यालयात सोमवारी (दि.17)  सर्वानुमते परभणी जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष  प्रविण चौधरी,कार्याध्यक्ष कैलास चव्हाण,साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हा कार्यालयाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन यांनी प्रास्ताविक केले तर व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्वानुमते परभणी जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.
अध्यक्ष - विवेक मुंदडा,कार्याध्यक्ष - अरुण रणखांबे, परभणी / लक्ष्मण उजागरे, पाथरी, उपाध्यक्ष - संग्राम खेडकर पालम, गोपाळराव लाड मानवत, साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी सोनपेठ, अकबर सिद्दीकी जिंतूर,
सरचिटणीस - रामेश्वर शिंदे, परभणी, सहसरचिटणीस - भूषण मोरे, कोषाध्यक्ष - एस.एन. इलाही, कार्यवाहक - दिलीप बोरूळ, सहकार्यवाहक - मयुर देशमुख, सहसंघटक - देवानंद वाकळे, संघटक - राजेश डागा,  के. डी. वर्मा, पांडूरंग अंभुरे, प्रवक्ता - मंदार कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख - सोमनाथ स्वामी, सदस्य - मुजीब शेख, शेख गौसोद्दीन शहाबोद्दीन, नागसेन भेरजे यांची निवड करण्यात आली आहे.
बीड येथे होऊ घातलेल्या विभागीय अधिवेशनास साप्ताहिक विंगच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आगामी काळात परभणी जिल्हयात जास्तीत जास्त साप्ताहिकाच्या संपादकांना सामावून घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

Friday, April 14, 2023

सर्व धर्मीय महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादनास उद्या सकाळी ठिक 9 वाजता उपस्थित रहा - सुभाषआप्पा नित्रुडकर

सर्व धर्मीय महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादनास उद्या  सकाळी ठिक 9 वाजता उपस्थित रहा - सुभाषआप्पा नित्रुडकर


सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीया उद्या दिनांक 22 एप्रिल 2023 शनिवार रोजी सकाळी ठीक 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व धर्मीय महात्मा बसवेश्वर यांची 892 व्या जयंती निमित्त अभिवादनास उपस्थित रहा असे आवाहन सुभाषआप्पा नित्रुडकर मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघ यांनी केले आहे, सोनपेठ शहरातील सर्व धर्मीय जसे जय भवानी मित्र मंडळ, जनसेवा मित्र मंडळ, इखरा मित्र मंडळ, आरंभ प्रतिष्ठान, श्री रंगनाथ महाराज गुरुजी प्रतिष्ठान, भीमगड मित्र मंडळ, लहुजी नगर मित्र मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गुरुवार भजनी मंडळ, एकता मित्र मंडळ, रोटरी क्लब सोनपेठ, सर्व मित्र मंडळ, सर्व समाज संघटना, सर्व व्यापारी असोसिएशन, सर्व सामाजिक कार्यकर्ते आदिंसह वीरशैव लिंगायत समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांच्या 892 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अखिल भारतीय वीर सेव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केली आहे.

Thursday, April 13, 2023

सोनपेठ येथील वरपूडकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

सोनपेठ येथील वरपूडकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै.र. व. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी "स्वतंत्र भारताच्या लोकशाहीकरणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान" या विषयावर भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, मुंबईच्या सहकार्याने ही एकदिवसीय परिषद संपन्न होत आहे. श्री पंडिरगुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर, जनविकास महाविद्यालय, बनसारोळा आणि कै.र. व. महाविद्यालय, सोनपेठच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय परिषद संपन्न होत असून या परिषदेचे उदघाटन पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री सुरेश वरपूडकर साहेब करणार असून अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेब राहणार आहेत. या परिषदेत प्रो.डॉ.राजाभाऊ बेद्रे, संचालक, अकॅडेमिक स्टाफ कॉलेज, सागर विद्यापीठ, मध्यप्रदेश हे बीजभाषण करणार असून सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि विचारवंत प्रो.डॉ.प्रकाश पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या एकदिवसीय परिषदेत डॉ.संजय गायकवाड, डॉ. रत्नाकर लकशेटे आदी मान्यवरांबरोबर विविध राज्यातून संशोधक आपले शोध निबंध सादर करणार आहेत. तेंव्हा दिनांक 15 एप्रिल रोजी संशोधक आणि इतर प्राध्यापक बंधू-भगिनींनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ.अरुण दळवे, प्राचार्य डॉ.हरिभाऊ कदम, समन्वयक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, डॉ.तिडके के.डी., डॉ.बापूराव आंधळे, डॉ.राजेश गायकवाड, डॉ.मकरंद जोगदंड, डॉ.एस.डी.दिक्षित, डॉ.अशोक गोरे आदींनी केले आहे.

Monday, April 3, 2023

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती एकुन 18 जागेसाठी 69 अर्ज चित्र दि.21 एप्रिल अंतिम यादी प्रकाशन झाल्यासच

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती एकुन 18 जागेसाठी 69 अर्ज चित्र दि.21 एप्रिल अंतिम यादी प्रकाशन झाल्यासच


सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती एकुन 18 जागेसाठी दिनांक 3 एप्रिल 2023 सोमवार रोजी नामनिर्देशन पत्र एकुन 69 दाखल,सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण 07 जागेसाठी 24 अर्ज दाखल यामध्ये प्रामुख्याने राजेश विटेकर,मधुकर निरपणे,दशरथ सूर्यवंशी, बालासाहेब जोगदंड, श्रीकांत भोसले, श्रीराम झिरपे, रामेश्वर मोकाशे, मुंजा धोंडगे, परमेश्वर कदम, गणेश कदम, विष्णू धोंडगे, दयानंद यादव,आश्रोबा यादव, अंगद रेवले, प्रल्हाद बचाटे, कल्याण हिक्के, विष्णू धोंडगे व निवृत्ती साठेसह इतर अर्ज दाखल झाली आहेत.महिला राखीव 02 जागेसाठी 08 अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने धोंडगे सावित्रीबाई, सोळंके अंजना, यादव वर्षा, खरात पुष्पा व इतर अर्ज दाखल झाले आहेत.इतर मागासवर्गीय 01 जागेसाठी 04 अर्ज दाखल यामध्ये पारेकर सतीष, बालाजी सुरवसे, काळे नंदकिशोर व महालिंग मेहत्रे असे आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती 01 जागेसाठी 03 अर्ज दाखल यामध्ये उत्तम जाधव,उत्तम राठोड व विश्वंभर गोरवे असे आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण दोन जागेसाठी 12 अर्ज दाखल यामध्ये प्रामुख्याने श्रीकांत भोसले, रामेश्वर मोकाशे, गंगाधर रेवले, अजयकुमार देशमुख, रावसाहेब पांडुळे व विठ्ठल सावंत सह इतर अर्ज दाखल झाले आहेत.अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती 01 जागेसाठी 04 अर्ज दाखल यामध्ये प्रामुख्याने आत्माराम रणखांबे, श्याम आवचारे व इतर अर्ज दाखल आहेत.आर्थिक दुर्बल घटकातून 01 जागेसाठी 06 अर्ज दाखल यामध्ये प्रामुख्याने अनिलकुमार रोडे,सुदर्शन कदम, भगवान जाधव व इतर अर्ज दाखल झाले आहेत. आरती व व्यापारी दोन जागेसाठी पाच अर्ज दाखल यामध्ये प्रामुख्याने गोरवे माणिक,भांडवले मुंजा, वडकर अमर,पांपटवार कैलास व कदम लता असे आहेत. हमाल व मापारी एक जागेसाठी तीन अर्ज यामध्ये सोनवणे चंद्रकांत, पठाण सज्जात व करनर कडाजी असे आहेत.या नामनिर्देशन पत्राच्या छाननीचा दिनांक व वेळ दिनांक 5 एप्रिल 2023 बुधवार रोजी सकाळी 11 ते छाननी संपे पर्यंत,वेध नामनिर्देशन पत्राची सूची प्रसिद्ध करण्याचा दिनांक 6 एप्रिल 2023 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता,उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक दिनांक 6 एप्रिल 2023 गुरुवार ते 20 एप्रिल 2023 गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत,निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन दिनांक 21 एप्रिल 2023 सकाळी 11 वाजता खरे चित्र स्पष्ट होणार,मतदान दिनांक 30 एप्रिल 2023 वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, लगेच मतमोजणी नंतर मतदानाचा निकाल घोषित करण्याचा येईल.अशा एकूण 18 जागेसाठी मतदार असतील सहकारी संस्था मतदारसंघ 322 मतदार आहेत,ग्रामपंचायत मतदार संघ 351 मतदार आहेत,व्यापारी मतदार संघ 185 मतदार आहेत तर हमाल व तोलारी मतदार संघ 43 मतदार आहेत.एकुन मतदार 901 आहेत.