Wednesday, June 22, 2022

कै रमेश वरपुडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कै रमेश वरपुडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सोनपेठ (दर्शन) :-
दिनांक 21/06/2022 मगंळवार रोजी कै रमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सकाळी ठीक 6:30 वाजता योगा व प्राणायाम आसणे यांची  प्रात्यक्षीक उपस्थिताकडून करून घेतली.
 आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरा प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमा साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत सातपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेख शकिला क्रिडा संचालक डॉ गोविंद वाकनकर,हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक  रामेश्वर कदम सोनपेठ  दर्शन साप्ताहिकाचे संपादक किरण स्वामी यांची उपस्थिती प्रमुख होती तर विद्यार्थी हमी कक्षाचे समन्वयक डॉ मुकुंदराज पाटील, डॉ काळे,डॉ कुलकर्णी,डॉ डॉ संतोष रनखांम,प्रा महालिंग मेहत्रे,संतोष वडकर,डॉ दिलीप कोरडे,तुकाराम तळेकर,संतुक परळकर,बाबुराव फड,दत्ता सोनटक्के सर्व महाविद्यालयीन कर्मचारी  प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक डॉ गोविंद वाकणकर यांनी केले तर योगाची प्रात्यक्षिके डॉक्टर विठ्ठल जायभाये योग प्रशिक्षक यांनी करून घेतली यावेळी योगासने शरीर निरोगी ठेवण्यासाठी फार महत्त्वाचे असल्याने दररोज योगा व प्राणायाम करावीत.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ संतोष रणखांब यांनी केले.

Friday, June 17, 2022

प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली सौरपंपासाठी ; शेतकऱ्यांची फसवणूक महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली सौरपंपासाठी ; शेतकऱ्यांची फसवणूक महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

 परभणी / सोनपेठ (दर्शन):-  

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत . यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे. 
 महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद , जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशाबद्दल सायबर सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत. त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल अॅप तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोट्या, संकेतस्थळासह मोबाईल अॅपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनांना बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर, अॅपवर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरू नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे. 'प्रधानमंत्री कुसुम योजना' शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी. अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, सिटी सर्व्हे न . १११४९ , शॉप न .३०५ , तिसरा मजला, साई ट्रेड सेंटर, रेल्वेस्टेशन रोड, औरंगाबाद फोन. ०२४० -२६५३५९५ ई - मेल domedaabad@mahaurja.com येथे संपर्क साधावा , असे आवाहनही श्री रोडे यांनी केले.

Sunday, June 12, 2022

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाची निधी गंगणे तालुक्यात प्रथम

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाची निधी गंगणे तालुक्यात प्रथम
सोनपेठ (दर्शन) :-

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी पुन्हा तालुक्यात प्रथम विज्ञान शाखेतील प्रथम गंगणे निधी अंगद 85.67 %, द्वितीय झाड पुजा दिपक 84.33%, तृतीय खरात अमर प्रल्हाद 81.50%, कला शाखेतील प्रथम राठोड रवि सुरेश ९०%, द्वितीय भंडारे संध्या बालासाहेब ८७.५०%, तृतीय साबळे कृष्णा गंगाधर ८३.८६%, वाणिज्य शाखेतील प्रथम काळे रुपाली रमाकांत 75.33%, द्वितीय रोडे साक्षी नवनाथ 72.67%, तृतीय चव्हाण कल्पना एकनाथ 72.33%.संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्या डॉ.शेख शकिला,सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक विद्यार्थी आदिंच्या वतीने तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवार व सर्व स्तरातून तमाम उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.तसेच अंगद गंगणे व सौ.मुक्ताताई गंगणे (सोमवंशी) यांनी निधीचे कौतुक करुन सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
***************************
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
***************************

Saturday, June 4, 2022

सोनपेठ तालुक्यातील 4 गट व 8 गणांचा प्रारुप मसुदा प्रसिध्द

सोनपेठ तालुक्यातील 4 गट व 8 गणांचा प्रारुप मसुदा प्रसिध्द
परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

जिल्हा परिषदेंतर्गत गट व पंचायत समितीच्या गणांच्या संख्येसह व्याप्ती बाबतचा प्रारुप मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरीकांसाठी गुरुवारी (दि.02) प्रसिध्द करण्यात आला.
          दरम्यान, या प्रारुप मसुद्याबाबत ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात 2 जून ते 8 जून या कालावधीत लेखी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाच्या संख्येसह व्याप्ती संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांनी पक्रिया सुरु केली. पाठोपाठ गुरुवारी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्‍चित करणारा प्रारुप मसुदा नागरीकांसाठी प्रसिध्द केला. संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांनी या अनुषंगाने कारवाई पूर्ण केली.पाठोपाठ त्या त्या तालुक्यात पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाच्या दर्शनी भागात या संबंधीचा प्रारुप मसूदा बोर्डवर झळकविण्यात आला आहे.
         या प्रारुप मसुद्यामधून त्या त्या तालुक्यात जिल्हा परिषद गटाची संख्या व निर्वाचक गणांची संख्या नमूद करण्यात आली असून त्याची व्याप्तीसुध्दा दर्शविण्यात आली आहे.सोनपेठ तालुक्यातील 4 गट व 8 गणांच्या संख्या व त्यांच्या व्याप्तीसंदर्भात माहिती
गट (1) शेळगाव (म).
गण (1) शेळगाव (म) - शेळगाव (म),शेळगाव (ह), भाऊचा तांडा, विटा खुर्द, वाघलगाव,वाणीसंगम व दुधगाव.
गण (2) शिर्शी (बु) - शिर्शी (बु), सखाराम तांडा, लोहीग्राम, लोहिग्राम तांडा, गंगापिंपरी, गोळेगाव, थडी उक्कडगाव,थडी पिंपळगाव,वाडी पिंपळगाव व लासीना.
गट (2) नरवाडी.
गण (3) नरवाडी - नरवाडी, सायखेडा, तुकाई तांडा, देवीनगर, मुंशीराम तांडा व चुकार पिंपरी.
गण (4) कान्हेगाव - कान्हेगाव, डोबाडी तांडा, शिरोरी, खडका,मोहळा, भिसेगाव, पोंहडुळ व पोंहडुळ तांडा.
गट (3)डिघोळ (ई).
गण (5) डिघोळ (ई) - डिघोळ (ई), रेवा तांडा, निमगाव खपाट पिंपरी, गवळी पिंपरी व धार डिघोळ.
गण (6) नैकोटा - नैकोटा, वाडी नैकोटा, आवलगाव, कोठाळा, कोठाळा तांडा, बौंदरगाव व धामोनी.
गट (4) उखळी (बु).
गण (7) उखळी (बु) - उखळी (बु),उखळी (बु) तांडा,पारधवाडी,बुक्तरवाडी, उक्कडगाव मक्ता व करम.
गण (8) वडगाव - वडगाव,मरगळवाडी,निळा, वैतागवाडी,तिवठाणा,वंदन व कोरटेक असे आहेत.
-------------------------------------------
सोनपेठ तालुक्यातील एकमेव जनतेचा आवाज सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन.मो.9823547752.
--------------------------------------------

Thursday, June 2, 2022

शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राविषयी विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राविषयी  विद्यार्थ्यांना आवाहन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

पुढील काही दिवसांमध्ये २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष चालू होत असून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी तथा विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (NCL) , केंद्रीय नमुन्यातील जात प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. या सर्व प्रमाणपत्राचे वितरण महसूल विभागामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाईन) करण्यात येते. प्रतिवर्षाचा अनुभव पाहता सर्वच अर्जदार ऐनवेळी अर्ज करून तातडीने प्रमाणपत्रांची मागणी करतात परंतु संगणकीय प्रणालीमध्ये किंवा अन्य तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने इच्छा असूनही वेळेत प्रमाणपत्र निर्गमित करणे शक्य होत नाही किंबहूना कागदपत्राची पडताळणी करताना अनेक अडचणीस सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपण आपल्या पाल्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारे आवश्यक ते दाखले, प्रमाणपत्रे वेळीच परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करून काढून घ्यावेत जेणेकरून आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान व आर्थिक पिळवणूक होणार नाही. तसेच कोणत्याही नागरीकास प्रमाणपत्रांसाठी जर कोणताही इसम किंवा ई-सेवा केंद्रचालक प्रमाणपत्रासाठी निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरीक्त अवाजवी रकमेची मागणी करत असल्यास तात्काळ या कार्यालयाचे निदर्शनास आणून द्यावे. असे दत्तु शेवाळे उपविभागीय अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-