दीपस्तंभ प्रतिष्ठान व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ तसेच नगर परिषद आयोजित भव्य महाआरोग्य शिबीरात गरजवंतानी नाव नोंदणी करुन सहभाग नोंदवावा
सोनपेठ (दर्शन) :- दीपस्तंभ प्रतिष्ठान व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने मा.ना.सौ. मेघना दिदी बोर्डिकर-साकोर (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी) यांच्या जन्मदिनानिमित्त व कै.राजाभाऊ दादाराव कदम यांच्या जयंती निमित्त "भव्य महाआरोग्य शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर शुक्रवार, १० एप्रिल २०२६ ठिक सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होईल,छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह, सोनपेठ जि.परभणी या ठिकाणी याशिबीरात - तज्ञ डॉक्टर मार्फत सर्व रोगांच्या तपासण्या व मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, मुतखडा, मनक्याची शस्त्रक्रिया, कान-नाक घसा शस्त्रक्रिया, हाडाचे फ्रॅक्चर, स्त्रीची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, यकृताची शस्त्रक्रिया, किडणीचे आजार, डोळ्याचा तिरळेपणा, अन्न नलीका शस्त्रक्रिया, अपेंडेक्स वरील सर्व शस्त्रक्रिया या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येतील. उद्घाटक: मा.श्री.परमेश्वर राजाभाऊ कदम (नगराध्यक्ष न.प. सोनपेठ), प्रमुख उपस्थिती: श्री. रंगनाथराव सोळंके (प्रदेश सरचिटणीस,भा.ज.पा. किसान मोर्चा महाराष्ट्र), सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे (सदस्या जि.प.परभणी), श्री.बळीरामजी पवार (मा.जिल्हाधिकारी तथा नगरसेवक न.प.सोनपेठ), श्री. दत्ताराव काका कदम (मा.उपनगराध्यक्ष न.प. सोनपेठ), श्री. जयप्रकाश बचाटे (गट नेते प.स.सोनपेठ), श्री.रामप्रसाद यादव (सरपंच), हाजी सद्दाम हुसेन (ग नेते न.प.सोनपेठ), श्री.अजय भैय्या देशमुख (सरपंच) व सर्व सन्माननीय नगरसेवक न.प. सोनपेठ.आयोजक नगर परिषद सोनपेठ व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ,सोनपेठ तसेच दीपस्तंभ प्रतिष्ठान,परभणी.संयुक्त विद्यमाने नाव नोंदणीसाठी संपर्क - संतोष आंबुरे - 7020531637, आशोक शेटे - 7397929536, जावेद शेख - 9804049999 सर्व गरजवंतानी नाव नोंदणी करुन सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.