सोनपेठ नगर परिषद प्रभागाचे आरक्षण जाहीर इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गंम....
सोनपेठ (दर्शन) : - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ नगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण दिनांक 8 ऑक्टोबर 2025 बुधवारी अनुसूचित जाती व नागरिकाचा मागास प्रवर्ग सोडत पध्दतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
सोनपेठ नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे या आरक्षण निश्चिततेकरीता उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यातून प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.याप्रसंगी सर्व पक्षीय नेते, संघटना व मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते भल्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले , प्रभाग क्रमांक 1 - अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2- अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 - नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला.
एकुणच प्रत्येक प्रभागात एक महीला आणि एक पुरुष दिलेला दिसुन येत आहे.समारोप प्रसंगी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment