




सोनपेठ गटसाधन केंद्र आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.दिनांक 05 डिसेंबर 2024 गुरुवार रोजी हे प्रदर्शन सोनपेठ येथील विश्वभारती प्राथमिक शाळा सोनपेठ येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक सोनपेठ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी शौकत पठाण सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हीजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रदीप खटाळ सर व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.तसेच परीक्षक म्हणून धिवार सर , म्हेत्रे सर, धसकटे सर उपस्थित होते.प्राथमिक व माध्यमिक गटात तालुक्यातील 35 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता.त्यामधे माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक(गणितीय मॉडलिंग आणि संगणकीय विचार) हा प्रयोग व्हिजन पब्लिक स्कूलचा रितेश पवार , आर्यन शिंदे व सह शिक्षिका सुनीता पवार, यांनी मिळविला व द्वितीय क्रमांक विश्वभारती सेकंडरी स्कूल (नैसर्गिक शेती) साक्षी मुळी, अनुष्का पवार व शिक्षक बाळू पवार, धीरज जोगदंड, मोईन शेख यांनी मिळवला आहे.व या प्रयोगाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन नागरगोजे सर यांनी केले.पालकांकडून व दोन्ही शाळेचे अध्यक्ष डॉ.बबन पवार सर, सचिव सारिका पवार मॅडम, प्रदीप खटाळ (प्राचार्य व्हीजन पब्लिक स्कूल), पप्पू पवार(विश्वभारती प्रा.विद्यालय), सुरज गायकवाड (उपप्राचार्य व्हिजन पब्लिक स्कूल) व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment