Monday, December 16, 2024

पोलीस अधीक्षक यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवून जिल्हाधिकारी यांना निलंबित करावे रिपाइंचे भूषण मोरे यांची मागणी

परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 
परभणी झालेल्या संविधान विटंबना प्रकरणातील दोषीवर कारवाई होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परभणी उपाध्यक्ष भूषण मोरे यांनी जिल्हाधिकारी मार्फत देशाचे राष्ट्रपती सह मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये
परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर 24 रोजी रेल्वे स्थानक जवळील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान पवार समाजकंटक देशद्रोही यांनी जी विटंबना केली व त्यानंतरची परभणीत उद्भवलेली परिस्थिती अनुषंगाने संविधान विटंबना प्रकरणात पोलीस कोठडीमध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी त्यांना जामीन मंजूर होऊन ही न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या मृत्यूची चौकशी सी.आय.डी मार्फत करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन म्हणून शासकीय सेवेमध्ये घेऊन त्यांना 25 लाख रुपये मदत करण्यात यावी. विटंबने नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत संविधानाची विटंबना ही बाब शुल्लक बाबा समजून तब्बल 24 तासानंतर जमावबंदी आदेश काढणारे परभणी जिल्हाधिकारी गावडे यांना तात्काळ राज्य शासनाने निलंबित करावे या संपूर्ण प्रकरणांमध्ये शहरातील भीमसैनिकांना घरात घुसून कॉम्बिन ऑपरेशन राबवणारे व महिला व पुरुषांना बालक बालिकांना अतिक्रुर मारहाण करण्याचे आदेश देणारे परभणी पोलीस अधीक्षक यांच्यावर ॲट्रॉसटी अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसह इतर मागण्याही निवेदनामध्ये करण्यात आलेले आहे.

Sunday, December 8, 2024

व्हीजन पब्लिक स्कूल &ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश सोनपेठ (दर्शन) :-





सोनपेठ गटसाधन केंद्र आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.दिनांक 05 डिसेंबर 2024 गुरुवार रोजी हे प्रदर्शन सोनपेठ येथील विश्वभारती प्राथमिक शाळा सोनपेठ येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक सोनपेठ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी शौकत पठाण सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हीजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रदीप खटाळ सर व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.तसेच परीक्षक म्हणून धिवार सर , म्हेत्रे सर, धसकटे सर उपस्थित होते.प्राथमिक व माध्यमिक गटात तालुक्यातील 35 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता.त्यामधे माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक(गणितीय मॉडलिंग आणि संगणकीय विचार) हा प्रयोग व्हिजन पब्लिक स्कूलचा रितेश पवार , आर्यन शिंदे व सह शिक्षिका सुनीता पवार, यांनी मिळविला व द्वितीय क्रमांक विश्वभारती सेकंडरी स्कूल (नैसर्गिक शेती) साक्षी मुळी, अनुष्का पवार व शिक्षक बाळू पवार, धीरज जोगदंड, मोईन शेख यांनी मिळवला आहे.व या प्रयोगाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन नागरगोजे सर यांनी केले.पालकांकडून व दोन्ही शाळेचे अध्यक्ष डॉ.बबन पवार सर, सचिव सारिका पवार मॅडम, प्रदीप खटाळ (प्राचार्य व्हीजन पब्लिक स्कूल), पप्पू पवार(विश्वभारती प्रा.विद्यालय), सुरज गायकवाड (उपप्राचार्य व्हिजन पब्लिक स्कूल) व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.