संजय गांधी योजना अंतर्गत समितीवर अध्यक्षपदी युवा नेते रामेश्वर मोकाशे यांची निवड
दिव्याग, श्रावण बाळ, विधवा, निराधार व वृधापकाळ लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत लवकरच बैठक घेणार - रामेश्वर मोकाशे
रामेश्वर भास्करराव मोकाशे
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली संजय गांधी योजना अंतर्गत समितीवर अध्यक्ष व सदस्यांची निवड नुकतीच पालकमंत्र्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे यामध्ये प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समिती सोनपेठ संचालक तथा युवा नेते रामेश्वर भास्करराव मोकाशे यांची निवड करण्यात आली, याप्रसंगी रामेश्वर मोकाशे यांना विचारणा करता सोनपेठ तालुक्यातील संजय गांधी अनुदान योजना अंतर्गत विधवा, दिव्याग, निराधार, वयोवृद्ध योजनेस पात्र असणाऱ्या तमाम जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री संजय बनसोडे व आमदार राजेश दादा विटेकर आदींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून दिलेल्या संधीचं सोनं करणार तसेच
दिव्याग, श्रावण बाळ, विधवा, निराधार व वृधापकाळ या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत लवकरच बैठक घेणार असल्याचे नुतन अध्यक्ष रामेश्वर मोकाशे यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले, नुतन अध्यक्ष रामेश्वर मोकाशे यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा सभापती दशरथ पाटील सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका पदाधिकारी व शहर अध्यक्ष बळीराम काटे सह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका व शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

