अब की बार, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार चारसौ पार - राजेश विटेकर
परभणी/सोनपेठ (दर्शन) :-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व महायुतीच्या सर्व 15 घटक पक्षांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय महायुतीच्या महामेळाव्यास उपस्थित राहिलो. त्याबैठकीत प्रत्येक मित्रपक्षाची भूमिका काय असेल यावर सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी राजेश विटेकर बोलताना अब की बार, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार चारसौ पार हे ध्येय ठेवून सर्वांनी काम करायचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे यांचे परभणी जिल्हा साठी गोदाकाठ सात बंधारे असो वा महानगरपालिका परभणी साठी 200 कोटि रुपये निधी मंजूर केला असे विषेश लक्ष परभणी लोकसभा मतदारसंघाकडे आहे.
येणाऱ्या निवडणूकीत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांने एकदिलाने काम करून महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका, विचार आणि कार्यप्रणाली मांडली, त्यानुसार प्रामाणिकपणे काम करून महायुतीचे संघटन वाढवणे, बूथ सशक्त करणे यावर विशेष करून चर्चा झाली.
यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, आ.बाबाजाणी दूर्राणी साहेब, आ.मेघनाताई बोर्डीकर, मा.आ.मधुसूदन केंद्रे साहेब, मा.आ.हरिभाऊ काका लहाने,आनंदराव भरोसे, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, राजेश विटेकर, डॉ.सुभाष कदम, सुरेश भुमरे, राजेशजी देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे, माधवराव कदम, किरण तळेकर, दीपक वारकरी, रोहन सामाले यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment