Tuesday, January 30, 2024

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आरक्षणाच्या लढ्याला यश मिळवून देणारी सात महत्त्वाची माणसे ?

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आरक्षणाच्या लढ्याला यश मिळवून देणारी सात महत्त्वाची माणसे ? 
अंतरवाली सराटी/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 
27 जानेवारी 2024 या दिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील विजयी सभा घेण्यात आली आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील मागण्या मान्य झाल्याचे घोषीत केले. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे जवळजवळ 3 ते 4 कोटी मराठ्यांचा ओबीसी समाजामध्ये समावेश झाला.  मागील 5 महिन्यांपासून सुरु असलेले मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आले. मागच्या 5 महिन्यात या आंदोलनाची अनेक रुपे अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहेत.कधी उपोषण, कधी दौरे,कधी जाहिर निषेध तर कधी मुंबईकडे धाव घेणारा विराट मोर्चा या सगळ्या गोष्टी पाहून नेहमीच अनेकांच्या भुवया ताणल्या जायच्या.एक मराठा लाख मराठा म्हणत खरचं लाखोंच्या गर्दिंचे परंतु अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होणारे हे मराठा आरक्षणाचे मोर्चे अनेकांचे लक्ष वेधून घ्यायचे आणि एकच चर्चा कानावर यायची की मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे नक्की अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी त्यांना या सगळ्या गोष्टींचे नियोजन आणि मराठा आरक्षणाला प्रगतीच्या दिशेने धावण्यासाठी बळ देत आहेत त्याच महत्त्वाच्या सात व्यक्तींबद्दल आपण आजच्या या लेखामध्ये माहिती मिळवणार आहोत.

*साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा मो.9823547752.*

1) पांडुरंग तारख :- सर्वात पहिले नाव येते अंतरवली सराटी येथील सरपंच असेलले पांडुरंग तारख. गावात चार पॅनल असूनही सरपंच निवडणूकीत तब्बल 200 मतांनी विजय झालेले पांडुरंग तारख हे नेहमीच सावलीसारखे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संपूर्ण आंदोलना दरम्याने दिसून आले. मराठा आरक्षणात जी देणगी जमा झाली त्याचे नियोजन आणि खर्चाच्या आयोजनाचे काम पांडुरंग तारख यांच्याकडे आहे. आंदोलनाच्या वेळी अनेक मंत्री, खासदार , आमदार मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला यायचे त्यांच्याकडे नेहमी काहीना काही कागद असायचे हे कागदपत्र सांभाळून ते योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील पांडुरंग तारख यांच्याकडेच असायचे. दिडशे एकरावर झालेल्या सभेचं नियोजनही तारख यांनीच केल्याचे सांगण्यात येत आहे. अंतरवली ते मुंबई हा मराठा आरक्षणाच्या मागणीचा शेवटचा टप्पा मानला जातो या टप्प्यातही महत्त्वाची भूमिका बजावर पांडुरंग तारख मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अगदी सावलीसारखे दिसून आले. (2)श्रीराम कुरणकर :- अखिल भारतीय छावा संघटनेचे सदस्य असलेल्या श्रीराम कुरणकर यांची मराठायोद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्याशी मैत्री झाली ती या संघटनेच्या कामा दरम्यानेच. त्यांतर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 2011 मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली ती कुरणकर यांच्या सोबतीने, जालना जिल्ह्यातील शेतकरी असलेले हे श्रीराम कुरणकर नेहमीच त्यांच्या जिवलग मित्राच्या सोबतीने म्हणजेच मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतीने मराठी आरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. सतत मराठायोद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्यासोबत राहून त्यांचे योग्य वेळी योग्य माणसांशी बोलणं करुन देणे, दौऱ्यावर असताना मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील कोणत्या गाडीत बसणार, कुठून कुठे प्रवास करणार या सगळ्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवणारे कुरणकर अनेकांच्या नजरेस पडले. (3)प्रदीप सोळूंके :- छत्रपती संभाजीनगर मध्ये शिक्षकी नोकरी करणारे हे गृहस्थ नेहमीच त्यांच्या उठवदार वाणीने केलेल्या किर्तन आणि भाषणं यांमुळे प्रसिद्ध आहेत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते नेहमीच समाजकारणात सक्रिय होते, 2020 साली त्यांच्या नावाची विधानपरिषदेच्या पदासाठी चर्चा झाली होती. त्यानंतर 2023 मध्ये शिक्षक मतदार निवडणूकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. परंतु मराठा आरक्षणामध्ये मात्र प्रदीप सोळूंके यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. त्यांनी गावागावत मराठा आरक्षण का मह्त्तवाचे आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारकडे केल्या जात आहेत या सर्व गोष्टी नागरिकांना समजावून सांगायचे. मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या भाषणाला पुरक अशी पार्श्वभूमी उभी करण्यात प्रदीप सोळूंके यांचा मोठा हात होता. (4)स्वप्नील तारख :- मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सोशल मिडियाच्या माध्यामातूनही मोठा पाठिंबा मिळाला. परंतु अनेरदा या मराठा आरक्षणाच्या बाबात चुकीच्या बातम्या देखील सोशल मिडियावर येत होत्या अशा चुकीच्या बातम्यांचे खंडन करुन योग्य ते अपडेट्स पोहोचवण्याचे काम मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने काढण्यात आलेल्या एका सोशल मिडिया अकाउंट वरुन केले जायचे. त्यासोबत मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची माहिती, आंदोलनाची पुढची दिशा काय असे अशा संपूर्ण अपडेट्स मराठा समाजापर्यंत डिजिटल स्वरुपात पोहोचवण्याचे काम स्वप्निल तारख यांनी केले आहे. (5)रमेश तारख :- रमेश तारख हे अंतरवली गावात झालेल्या आंदोलनापासून ते साष्टी पिंपळगांव येथे झालेल्या प्रत्येक आंदोलनात पुढे होते.मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत विविध नियोजनात आणि चर्चेमध्ये ते भाग घेत होते. आंदोलना दरम्याने येणारे मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासोबत बोलणी करीत होते. (6)संजय कटारे :- मराठा आरक्षणातील प्रत्येक दौऱ्यात सभेत आणि गर्दिचे नियोजन करण्यात संजय कटारे हे नेहमची कायम महत्त्वाची भूमिका बजावत होते. मराठा आरक्षणाचे गेल्या चार वर्षात महाराष्ट्रभर अनेक दौरे झाले या सगळ्या दौऱ्यांमध्ये नियोजनात्मक काम पाहणारे संजय कटारे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (7)धनंजय दुफाके :- शेतकरी कुटुंबातील धनंजय दुफाके यांनी देखील मनोज जरांगे पाटिल यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, महाराष्ट्रात ज्या ज्या भागांमधून आमच्याकडे दौरा करा अशी मागणी यायची तेथील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बोलून आंदोलनासाठी जागेची व्यवस्था करण्यापासून ते येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोयी सुविधां पुरविण्यासाठीचा बंदोबस्तात हे सगळेच चेहरे काम करीत होते.

Sunday, January 14, 2024

अब की बार, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार चारसौ पार - राजेश विटेकर

अब की बार, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार चारसौ पार - राजेश विटेकर

परभणी/सोनपेठ (दर्शन) :-

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व महायुतीच्या सर्व 15 घटक पक्षांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय महायुतीच्या महामेळाव्यास उपस्थित राहिलो. त्याबैठकीत प्रत्येक मित्रपक्षाची भूमिका काय असेल यावर सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी राजेश विटेकर बोलताना अब की बार, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार चारसौ पार हे ध्येय ठेवून सर्वांनी काम करायचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे यांचे परभणी जिल्हा साठी गोदाकाठ सात बंधारे असो वा महानगरपालिका परभणी साठी 200 कोटि रुपये निधी मंजूर केला असे विषेश लक्ष परभणी लोकसभा मतदारसंघाकडे आहे.
येणाऱ्या निवडणूकीत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांने एकदिलाने काम करून महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका, विचार आणि कार्यप्रणाली मांडली, त्यानुसार प्रामाणिकपणे काम करून महायुतीचे संघटन वाढवणे, बूथ सशक्त करणे यावर विशेष करून चर्चा झाली.
            यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, आ.बाबाजाणी दूर्राणी  साहेब, आ.मेघनाताई बोर्डीकर, मा.आ.मधुसूदन केंद्रे साहेब, मा.आ.हरिभाऊ काका लहाने,आनंदराव भरोसे, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, राजेश विटेकर, डॉ.सुभाष कदम, सुरेश भुमरे, राजेशजी देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे, माधवराव कदम, किरण तळेकर, दीपक वारकरी, रोहन सामाले यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो.9823547752.

Sunday, January 7, 2024

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचा उद्या परभणी दौरा

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचा उद्या परभणी दौरा

परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचा उद्या परभणी दौरा दिनांक 8 जानेवारी 2024 सोमवार रोजी लातूर येथून परभणी कडे मोटारीने प्रयाग, सकाळी 11 वाजता स्वागत व सत्कार हॉटेल नक्षत्र परिसर, परळी ते गंगाखेड रोड वडगाव स्टेशन, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, सकाळी 11:50 वाजता स्वागत व सत्कार, परभणी बस स्थानक जवळ, माजी सभापती संदीप हिवाळे, दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बैठक ,हॉटेल फनपार्क मंगल कार्यालय परभणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी , दुपारी 4 वाजता मा. ना. श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री नियोजित दौरा कार्यक्रम स्थळ पाहणी व आढावा बैठक, राजलक्ष्मी लाॅन पाथरी रोड परभणी, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, सायंकाळी 5 वाजता महायुतीतील सर्व प्रमुखांच्या भेटी व मित्र पक्षाचे नेते भेट व संवाद, सावली शासकीय विश्रामगृह, सायंकाळी 7 वाजता सुजाता बुद्ध विहार येथे भेट, सुजाता कॉलनी जुना पेडगाव रोड परभणी, नंतर सावली शासकीय विश्रामगृह राखीव , रात्री 8.10 वाजता मोटारीने रेल्वे स्टेशन कडे प्रयाण , रात्री 8.20 वाजता परभणी येथून मुंबईकडे देवगिरी एक्सप्रेस ट्रेनने प्रयाण करतील.