सोनपेठ शहरात उद्या मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष, भव्य फेरी द्वारे सभेसाठी आवाहन...
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरात दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता श्री गणेश जिनिंग मैदान येथे होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य दिव्य जाहीर सभेत उद्या मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोनपेठ येथील भव्य दिव्य महासभेत लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याच्या करिता सोनपेठ तालुक्यातील गाव गावाचे स्वयंसेवक 500 नियुक्त केले आहेत, तसेच समाज बांधवांना खिचडीची सोय खपाट पिंपरी येथील सकल मराठा समाज बांधवांनी उचलली असून सोनपेठ शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ही खिचडी व पिण्याच्या पाण्याची सोय हाती घेतलेली दिसून येत आहे, सोनपेठ नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या पुढाकारांने मानवत नगर परिषद चे फिरते शौचालय 2 सकल मराठा समाज बाधवांच्या सोईसाठी शहरात दाखल झालेले आहेत. दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता सोनपेठ शहरातील प्रमुख मार्गाने सकल मराठा समाज बांधव स्वयंसेवकांची फेरी द्वारे सर्वांना सहकुटुंब सहपरिवार सभेसाठी उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले आहे. सोनपेठ तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी सोनपेठ शहर भगवेमय व डिजिटल करून टाकले आहे, भगव्या पताकांनी लोकांचे लक्ष वेधले असून डिजिटल वर केवळ मनोज जरांगे पाटील शिवाय दुसरा कोणीही दिसून येत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर हलगी यांनी दोन ॲम्बुलन्स डॉक्टर व सिस्टर सहित प्राथमिक औषधोपचारासह सज्ज ठेवल्या आहेत.










