परळीत 7 जानेवारीला होणार राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजाचा वधू - वर परिचय मेळावा
परळी / सोनपेठ (दर्शन) :-
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्याचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधु वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री महादेवआप्पा इटके यांची निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून, शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.याच अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताआप्पा ईटके गुरुजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वीरशैव विकास प्रतिष्ठान अध्यक्ष श्यामभाऊ बुद्रे, सचिव फुलारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत,यावर्षीही 7 जानेवारी 2024 रविवारी सकाळी 10 वाजता गुरूलिंग स्वामी मंदिरात मेळावा संपन्न होणार असून त्यासाठी वीरशैव वधू वर पालक मेळावा कार्यकारिणी घोशीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष तथा वीरशैव सामुदायिक विवाह अध्यक्ष महादेव ईटके यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष शिवकुमार चौंडे, सचिन स्वामी, सौ उज्वला आलदे, गजानन हालगे तर सचिव म्हणून चंद्रकांत उदगीरकर, सहसचिव प्रकाश खोत, उमाकांत पोपडे, सौ कोमल बेलुरे, कोषाध्यक्ष सुशील हरंगुळे, सह कोषाध्यक्ष सतिश रेवडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी नागेश हालगे, शिवकुमार केदारी, विकास हालगे , योगेश मेनकुदळे, संजय स्वामी मठपती, महेश निर्मळेसर , नरेश साखरे सर ,दत्ता गोपनपाळे, सोमनाथ गोपनपाळे सर, यांच्या सह ईतर समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. राज्यस्तरीय वीरशैव वधू वर पालक परिचय मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करणार असल्याचे सविस्तर कार्यकारणी व विविध समित्या लवकरात मिटिंग घेऊन जाहीर करण्यात संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्यास तमाम विरशैव लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
______________________________
संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन सोनपेठ तालुक्यातील एकमेव वृत्तपत्र बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा मो.9823547752.
______________________________





