सक्षम लोकशाहीसाठी मतदार नोंदणी आवश्यक - प्रभाकर सिरसाठ
सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात आजच्या बौद्धिक सत्रात बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाठ यांनी वरील उद्गार काढले.तसेच बोलताना भारतीय जनतेला भारतीय संविधानाने मताधिकार दिला आहे.त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदान नोंदणी केली पाहिजे.एका वर्षातून चार वेळा नोंदणी करता येते असे आवाहन केले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कल्यान गोलेकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाठ तर प्रमुख उपस्थितीत डॉ.अशोक चव्हाण हे होते.संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजण करुन सुरुवात करण्यात आली,बौद्धिक सत्राचे आयोजन राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रुपने केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ बापुराव आंधळे,प्रा.अंगद फाजगे, डॉ.मुक्ता सोमवंशी, क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर,प्रा.महालिंग मेहेत्रे, विद्यार्थी प्रतिनिधी आशिष शिंदे,अस्मिता कांबळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता कुरूडे हिने केले तर आभार प्रदर्शन वर्षा ढेंबरे हिने केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



No comments:
Post a Comment