Saturday, January 28, 2023

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्न

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा
सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्न





परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सकारात्मक पत्रकारिता ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे, हे विचार रुजवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने या वर्षीपासून व्हॉईस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार सुरू केला आहे.यात रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार तसेच विशेष पाच पुरस्कार व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शनिवार दि.२८ जानेवारी रोजी निरज हॉटेल येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया हा देश पातळीवरील पत्रकार संघटनेचे १८ हजार सदस्य असून २३ राज्यात ही संघटना सक्रिय आहे. सकारात्मक पत्रकारिता वाढावी यासाठी संघटनेच्या वतीने यावर्षी पासून अडीच लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.या पुरस्कारांचे स्वरूप प्रथम बक्षीस रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, द्वितीय ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान असे आहे.उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणार्या सकारात्मक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. महाराष्ट्र व मराठी भाषेपुरतीच ही स्पर्धा असणार असून जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. व्हॉईस ऑफ मीडिया कोकण विभागीय कार्यालय एल. ३०- १२०१ - स्वप्नपूर्ती, सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत संघटनेच्या सर्वच ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांना सहभागी होता येणार नसल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा संघटने बाहेरील पत्रकारांसाठी सुद्धा असणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक बातम्या लिहून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य सहसरचिटनिस डॉ.ज्ञानेश्वर भाले, राज्य कार्यवाहक सूरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अक्षय मुंडे, कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, प्रदीप कांबळे, मोईन खान, सुशील गायकवाड, मोहन धारासुरकर, प्रसाद जोशी, अमोल लंगर आदींची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती.
______________________________
साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
-----------------**********----------------

Saturday, January 14, 2023

हाफेज अली शेर कुरेशी एम.आय.एम.पक्षाच्या तीन तालुक्याच्या इनचार्ज म्हणून नियुक्ती

हाफेज अली शेर कुरेशी एम.आय.एम.पक्षाच्या तीन तालुक्याच्या इनचार्ज म्हणून नियुक्ती 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील AIMIM पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते हाफेज अली शेर कुरेशी यांच्या पक्षाच्या कार्याची दखल घेत तसेच पक्षा बदल निष्ठा पाहून सोनपेठ, मानवत व पाथरी या तिन तालुक्याच्या इनचार्ज पदी नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अल-हज मेरेस्टर असदोदिन आयेसी साहेब व AIMIM पक्षाची विचारसरणी व पेय धोरण तळागळातील लोकांपर्यंत पोहचवायें व ऑल इंडिया मजलीस ए इतिहादून मुस्लीमीन या पक्षाच्या उन्नती व प्रगतीसाठी कार्य करावे तसेच सोनपेठ, मानवत व पाथरी या तिन्ही तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताल ही अपेक्षा व पूढील वाटचालीस आपल्या नियुक्ती बदल हार्दिक शुभेच्छा जिल्हा अध्यक्ष ॲड.इम्तियाज खान यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त केलेल्या आहेत.

पंचायत समिती सोनपेठ येथे पशुपालकांचे स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रम संपन्न

पंचायत समिती सोनपेठ येथे पशुपालकांचे स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रम संपन्न 
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती सोनपेठ येथील कै.उत्तमराव आबाजी विटेकर ( भाऊ) सभागृह येथे पशुपालक स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंद राठोड व प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एम. पी. कदम उपस्थित होते.
तसेच पशुसंवर्धन विभागातील डॉ. समीर भालके, रामेश्वर टरपले शिवराज मोराळे, सुनिल पोटभरे एम. यु. चौधरी व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. समीर भालके यांनी 'माझा गोठा स्वच्छ गोठा' या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेविषयी सखोल मार्गदर्शन केले, डॉ. गोविंद राठोड यांनी शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. एम. यु. चौधरी यांनी मुरघास तंत्रज्ञानाबाबत सखोल मार्गदर्शन केले. रामेश्वर टरपले यांनी पशुपालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज मोराळे, प्रकाश तिरमले व आदींनी परिश्रम घेतले.

Monday, January 9, 2023

पोस्ट ऑफिसच्या "सुकन्या समृद्धी योजनेचा" लाभ घ्या - पोस्टमास्तर डी एम माने

पोस्ट ऑफिसच्या "सुकन्या समृद्धी योजनेचा" लाभ घ्या - पोस्टमास्तर डी एम माने


सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील पोस्टमास्टर डी एम माने यांनी सोनपेठ पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केले आहे की पोस्ट ऑफिसच्या "सुकन्या समृद्धी योजनेचा" लाभ घ्यावा मुलींच्या समृद्ध भविष्यासाठी आपल्या 0 ते 10 वर्षे वयापर्यंतच्या मुलींसाठी सुवर्णसंधी, प्रारंभिक गुंतवणूक किमान रुपये 250/-, खाते उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत डिपॉझिट 1 आर्थिक वर्षात कमीत कमी 1000/- रुपये व जास्तीत जास्त 1,50,000/- पर्यंत गुंतवणूक, रुपये 50/- भरून खंडित खाते सुरू करता येते, खाते उघडल्यापासून 21 वर्षानंतर परिपक्व होते, मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी 50 टक्के रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी काढता येते, वयाच्या 18 वर्षानंतर मुलीचा विवाह झाल्यानंतर खाते मुदतपूर्व बंद करता येते, अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ची संपर्क साधावा परभणी डाक विभाग, तसेच सोनपेठ पंचक्रोशीतील नागरिकांना पोस्टमास्तर डी एम माने,पोस्टमास्तर अजय राठोड. मो. 9850017743.संपर्क साधावा.

Saturday, January 7, 2023

सक्षम लोकशाहीसाठी मतदार नोंदणी आवश्यक - प्रभाकर सिरसाठ

सक्षम लोकशाहीसाठी मतदार नोंदणी आवश्यक - प्रभाकर सिरसाठ 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात आजच्या बौद्धिक सत्रात बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाठ यांनी वरील उद्गार काढले.तसेच बोलताना भारतीय जनतेला भारतीय संविधानाने मताधिकार दिला आहे.त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदान नोंदणी केली पाहिजे.एका वर्षातून चार वेळा नोंदणी करता येते असे आवाहन केले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष‌ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कल्यान गोलेकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती अशासकीय सदस्य प्रभाकर सिरसाठ तर प्रमुख उपस्थितीत डॉ.अशोक चव्हाण हे होते.संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजण करुन सुरुवात करण्यात आली,बौद्धिक सत्राचे आयोजन राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रुपने केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ बापुराव आंधळे,प्रा.अंगद फाजगे, डॉ.मुक्ता सोमवंशी, क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर,प्रा.महालिंग मेहेत्रे, विद्यार्थी प्रतिनिधी आशिष शिंदे,अस्मिता कांबळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता कुरूडे हिने केले तर आभार प्रदर्शन वर्षा ढेंबरे हिने केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Friday, January 6, 2023

सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे- सीईओ विनय मुन दर्पण दिनानिमित्त परभणीत दिडशे पत्रकारांची आरोग्य तपासणी

सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे- सीईओ विनय मुन
दर्पण दिनानिमित्त परभणीत दिडशे पत्रकारांची आरोग्य तपासणी

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी आपले आरोग्य जपावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केले. 
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सुर्या हॉस्पीटलच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित आरेाग्य तपासणी शिबीरामध्ये 150 पत्रकारांची  आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले.
या निमित्ताने आयोजित दर्पण दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, सुर्या हॉस्पीटलचे संचालक डॉ.संजय खिल्लारे, डॉ. संदिप काला, डॉ. प्रविण संगवे, डॉ. महेश कडे, डॉ. आसाराम लोमटे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, प्रविण देशपांडे, राजकुमार हट्टेकर, प्रभू दिपके आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना विनय मुन यांनी पत्रकार आणि प्रशासन यांचे काम धकाधकीचे असते, दोन्ही घटक आपल्या परीने काम करत असतात. मी या ठकाणी नविन असलो तरीही जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य क्षेत्रात अनेक ठिकाणी आपणास काम करावयाचे आहे. पत्रकारांनी या बाबत प्रशासनाला सहकार्य करावे, सर्वांनी आपले आरेाग्य राखावे असे आवाहन केले.
यावेळी बोलतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात आपण पुढाकार घेतला असल्याचे सांगत दर्पण दिनानिमित्त त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात. डॉ. राजगोपाल कालानी यांनी आपली दिनचर्या कशी असावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. संजय खिल्लारे, डॉ. प्रविण संगवे, डॉ. आसाराम लोमटेयांनी विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात आयएमएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. राजगोपाल कालानी यांचा सूर्या हॉस्पीटल आणि पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्या तआला. सुत्रसंचलन मंचक खंदारे, प्रास्ताविक राजकुमार हट्टेकर यांनी तर आभार प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी मानले. 
या कार्यक्रमापूर्वी सकाळच्या सत्रात सुमारे १५० पत्रकारांची मधुमेह, रक्तदाब, इसीजी, पोटाचे विकार आदी तपासण्या करण्यात आल्या.  शिबीराच्या यशस्वीतेसाठी सुर्या हॉस्पीटलचे महेंद्र देशमुख यांच्यासह  महालॅबचे सय्यद कामील, अविनाश येडेकर, मंजूषा एडके, पंकज मोताळे, प्रल्हाद फेगडे, साबेर अन्सारी, ज्ञानेश्‍वर कायंदे, शरद जाधव, संगीता धबाले, लक्ष्मण आवाड, जयेंद्र गायकवाड, राहूल अग्रवाल, तुषार टेंगळे यांनी परिश्रम घेतले. 
    या आरेाग्य तपासणी शिबीरावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, हेमंत कौसडीकर, जकीयोद्दीन खतीब, नेमीनाथ जैन, लक्ष्मीकांत बनसेाडे, लक्ष्मण मानोलीकर, दिलीप बोरुळ, माणिक शिंदे, मोईन खान, सय्यद युसूफ, भूषण रोकडे, राजा पुजारी, सुदर्शन पुजारी, मोहमद युसूफ,  रामेश्‍वर शिंदे, अरुण पवार,  मदन कोल्हे, संजय घनसावंत, अनिल लांडगे, रमेश नाटकर, प्रभू दिपके, सोमेश लाहोरकर, देवानंद वाकळे, भूषण मोरे, लक्ष्मण समेटा, प्रदिप लांडगे, माणिक रासवे, संघपाल अढागळे, शरद कुल्थे, संपादक किरण स्वामी, सुनिल सुतारे, बळीराम जोगदंड, गणेश मुटकुळे,  हेमंत मुथा, शिवाजी वाकोडे,प्रकाश गुंड,अब्दुल रहिम खान, मंचक खंदारे,भगवान सुर्यवंशी,पुष्पा बनसोडे,पवन मुंदडा,राजकुमार हट्टेकर, अब्दुल रहिम,बाळासाहेब शिंदे, सयद जमिल,राजू कर्डीले,प्रविन देशपांडे, प्रशांत कोसडीकर,सय्यद रइस, विजय पानबुडे, अनंता रेनगडे,पद्माकर चोपडे, श्रीमंत सरोदे, प्रसन्न लाठकर, बळीराम सुक्रे,मंदार बर्दापूरकर,पांडूरंग अंबुरे,  सय्यद खिजर, भगिरथ बद्दर,सय्यद रफीक, ओमकार भुसारे, शैलेश काटकर, नरहरी चौधरी,लक्ष्मीकांत जवळेकर, देवानंद नावकीकर आदींची उपस्थिती होती.