मारवाडी बालाजी मंदिर येथे मारवाडी समाजाचा गणगौरीचा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा
सोनपेठ (दर्शन) :- प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी मारवाडी समाजाच्या वतीने गणगौरीचा संन उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील मारवाडी बालाजी मंदिर येथे दि. २० मार्च रोजी पारंपारिक पद्धतीने मारवाडी समाजातील स्त्रियांनी श्री गणगौरीचा सण मोठ्या उच्छाहात साजरा केला.या गणगौर सण उत्सवात समाजातील पुरुषांनी सहभाग नोंदवला होता.
या प्रमाणे शहरात याही वर्षी गणगौर सन उत्साहात साजरा करण्यात आला. मारवाडी समाजातील श्री गणगौरीचा सण तिथी प्रमाणे सप्तमीच्या दिवशी प्रारंभ होतो.या दिवशी श्री गणगौरी च्या समोर एका कुंड्यात शेतातील काळ्या मातीत गव्हू पेरले जातात.या नंतर १५ दिवस प्रत्येक दिवशी सर्व समाजातील महिला त्या कुंड्यातील पेरलेल्या धान्याचे व श्री गणगौरीच्या प्रतिमेचे पूजन करतात व विधीवत त्यांचे लग्न करतात तसेचं लग्नानंतर सामुहिक भोजनाचा कार्यक्रम करुन १६ व्या दिवशी श्री गणगौरी सह ते धान्य घेऊन शहरातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत त्यांची शोभा यात्रा काढण्यात येते. हा वसंत ऋतू, सुगी, वैवाहिक निष्ठा, वैवाहिक सुख आणि संततीचा उत्सव आहे. अविवाहित स्त्रिया चांगला पती मिळावा या आशेने देवीची पूजा करतात, तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी तिची पूजा करतात. गणगौर हा राजस्थानमधील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे. "गण" हे भगवान शिवाचे समानार्थी शब्द आहे आणि "गौरी" किंवा "गौर" म्हणजे भगवान शिवाची पत्नी देवी पार्वती आहे.
मारवाडी पद्धतीने गणगौर उत्सव हा चैत्र महिन्यात १६ दिवस अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे, ज्यामध्ये विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली चांगल्या पतीसाठी पार्वती (गौरी) आणि शिव (ईसर) यांची पूजा करतात. पारंपरिक पोशाख, "गौर गौर गोमती" सारखी लोकगीते आणि शोभायात्रा ही या महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत, जी प्रेम आणि वैवाहिक सौख्याचे प्रतीक आहे. शहरातील मारवाडी बालाजी मंदिरातून गणगौरीची शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रा मध्ये समाजातील सर्व महिला पारंपारिक वेशभूषा परिधान करतात. तर समाजातील पुरुषांनी या गण गौरीच्या शोभायात्रेत पांढरे वस्त्र परिधान करून सहभाग नोंदवला होता. या यात्रेत जागोजागी फुगडी,गर्भा,डांस इत्यादी करत व त्यानंतर त्या धान्याचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात येते. या नंतर बालाजी मंदिर येथे स्वागत लहान मुलगी रिशा झंवर हिने गाईले. तर प्रतिक्षा वर्मा, श्रद्धा , श्वेता ,वैष्णवी चांडक यांनी प्रसंगी सामुहिक डांस सादरी केला.
तर गणगौरीच विधिवत लग्नासाठी जोडीदार विजय वर्मा सौ. प्रतिक्षा वर्मा व प्रणय मालू, सौ. वैष्णवी मालू या सनवदांपत्यानी गौरी व इसरजी यांची प्रतिमा हातात घेऊन गौरी व इसरजी यांचे लग्न लावण्यात आले.या नंतर सर्व समाजाने जेवण्याता आस्वद घेतला.या यात्रेस सर्व मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता.