जीवनदान रक्तदान महाकुंभ 2026 सोनपेठ शहरात सहभाग नोंदवा रक्तदान करा !
स्व.बाळासाहेब ठाकरे चौक
परळी रोड सोनपेठ.
मो. 9970886134
सोनपेठ (दर्शन) :-
जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धाम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान रक्तदान महाकुंभ 2026 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 ते 18 जानेवारी 2026 असे 15 दिवस चालणाऱ्या या महा कुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबविला जात आहे, मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजाच्या मायक्रोसाईटिक ॲनिमिया, सिकलसेल, थँलिसीमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्तांच्या एका थेंबासाठी तडफडत असतात, अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता आपले फक्त 5 मिनिट आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटाची असती तरी त्या काही थेंबामुळे एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो, एखादे बालक नव्याने श्वास घेते, एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येतो, असे रक्तदान महाकुंभ प्रतिवर्षाप्रमाणे वर्ष तिसरे श्री क्लिनिक कराड कॉम्प्लेक्स,बाळासाहेब ठाकरे चौक परळी रोड सोनपेठ येथे डॉ.महेशकुमार पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या अनुयायांच्या सहकार्याने होत आहे, या पवित्र दानामध्ये जीवनदान रक्तदान महाकुंभ 2026 सोनपेठ शहरात सहभाग नोंदवा रक्तदान करा! असे आवाहन छत्रपती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कराड यांनी केले आहे.