Saturday, February 24, 2024

व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी मुंबईत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी मुंबईत
 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
 
मुंबई/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2023 व उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार 2023 चा वितरण समारंभ मुंबईत सोमवारी (ता. 26) राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे. राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडिया, शेठ ब्रिज मोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित  
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष लढ्ढा राहणार असून या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, परभणीचे आमदार राहुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, विचारवंत नामदेव भोसले व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची उपस्थिती राहणार आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. व्हॉईस ऑफ मीडियाच्या व प्रदेश,विभाग, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केले आहे.
................................................................

Thursday, February 1, 2024

साप्ताहिक शिक्षण मार्गाचे शिक्षक गौरव पुरस्कार प्रा.डॉ.संतोष रणखांब यांना जाहीर

साप्ताहिक शिक्षण मार्गाचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर ; परळी येथे 11 फेब्रुवारी रोजी होणार वितरण 



परळी/सोनपेठ (दर्शन) :- 
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या साप्ताहिक शिक्षण मार्ग च्या वतीने देण्यात येणाऱे  शिक्षक गौरव पुरस्कार  जाहीर करण्यात आले आले आहेत. येत्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचे संयोजन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन शिक्षण मार्गाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये मराठवाड्यातील धारुर येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील  प्रा.डॉ.नितीन कुंभार, अनुप कुसुमकर महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय मोहा, श्रीमती वंदना विश्वंभर कराड, जि. प. प्राथमीक शाळा मिरवट, तालुका परळी, प्रा.डॉ.संतोष रणखांब कै रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ. जिल्हा परभणी. राहुल पोटभरे, जि. प. प्राथमिक शाळा मोहा. तालुका परळी. सिद्धेश्वर इंगोले, शिवछत्रपती विद्यालय परळी वैजनाथ.बीड.
    याबरोबरच प्रा. रवींद्र जोशी, कै. राजीव गांधी अनुसूचित जाती, जमाती, निवासी आश्रम शाळा, खडका जिल्हा परभणी. गणेश खाडे, माध्यमिक आश्रम शाळा, कौडगाव हुडा. तालुका परळी. ललिता धोंडीराम राठोड मुख्याध्यापक, सुधाकरराव नाईक विद्यालय संभाजीनगर, भास्कर दत्तात्रय आंधळे, जि. प. प्राथमीक शाळा. वाघबेट, श्रीमती अनिता गर्जे, जि प माध्यमिक शाळा, परळी वैजनाथ. नंदकिशोर सुरेश जातकर, जि प प्रा शा. टोकवाडी, मधुकर पवार, मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोल उमरी, नांदेड. नसरीन सुलताना सलीम शेख, मिलीया प्राथमिक शाळा धारूर, सौ विनिता विठ्ठल कराड, ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ. हरिश्चंद्र दत्तात्रय सोनवणे, जि प प्राथमीक शाळा, डाबी, अविनाश नेहरकर, जि प प्राथमीक शाळा, नागापूर, वसंत राठोड संत तुराबाई आदर्श प्राथमिक विद्यालय परळी प्राध्यापक शंकर सिनगारे, जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई, आणि बी.जी.कदरकर,  मुख्याध्यापक, मिलिंद विद्यालय, परळी वैजनाथ यांना शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
   परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी नाथ टॉकीज रोड, औद्योगिक वसाहत सभागृह, येथे संपन्न होणाऱ्या सहाव्या विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक ए.तु. कराड हे आहेत.स्वागताध्यक्ष प्रदीप खाडे तर संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रा. अनिलकुमार साळवे यांचे हस्ते होणार आहे.