Wednesday, July 27, 2022

सोनपेठ पंचायत समिती,जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

सोनपेठ पंचायत समिती,जिल्हा परिषद आरक्षण जाहीर





सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण तहसील कार्यालयातील सभागृहात दि.28 जुलै 2022 रोजी मा.आंचल गोयल जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात मा.अरुन जऱ्हाड उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.सारंग चव्हाण तहसीलदार यांनी जाहीर केले यामध्ये एकुण 8 गणापैकी 1) 75 - शेळगाव (म) - सर्वसाधारण, 2) 76 - शिर्शी - अनुसूचित जाती (महिला), 3) 77 - नरवाडी - सर्वसाधारण, 4) 78 - कान्हेगाव - सर्वसाधारण (महिला), 5) 79 - डिघोळ - सर्वसाधारण, 6) 80 - नैकोटा - सर्वसाधारण (महिला), 7) 81 - उखळी बु. - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 8) 82 - वडगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) याप्रसंगी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून सर्व आरक्षण जाहीर केले आहेत.शेवटि सर्वसाधारण महिला यांचे दोन जागेचे आरक्षण चिठ्ठ्या टाकून सार्थक घोडके या 11 वय वर्ष असणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले.जिल्हा परिषद गट सोनपेठ तालुक्यातील 4 पैकी 1) 38 -  शेळगाव (म) - सर्वसाधारण, 2) 39 - नरवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3) 40 - डिघोळ - सर्वसाधारण (महिला), 4) 41 - उखळी बु - सर्वसाधारण (महिला) अशी माहिती सूत्रांनी दिली,यावेळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अनिल घनसावंत, प्रकाश गायकवाड यांच्या सह तालुक्यातील सर्व पक्षीय नेते तथा कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
बातमी व जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन
मो.9823547752.

Saturday, July 2, 2022

सोनपेठ पोलिसांना भुरट्या चोरांना आळा घालण्यास यश,दोघे कस्टडीत एक फरार

सोनपेठ पोलिसांना भुरट्या चोरांना आळा घालण्यास यश,दोघे कस्टडीत एक फरार



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात होत असलेल्या भुरट्या चोरीच्या अनुषंगाने गावात दिनांक 25/6/2022 रोजी सोनपेठ पोलीस स्टेशन कडील कर्मचारी गोपनीयरीत्या पेट्रोलिंग करीत असताना काही इसम संशयितरित्या हालचाली करत असल्याचे दिसून आले वरून त्यांचेवर बराच वेळ वाच ठेवला व साधारण रात्री अकरा वाजता च्या सुमारास त्यांना पकडण्यासाठी झडप घातली असता एकूण तिघांपैकी दोन जणांना सोनपेठ पोलिसांनी शिताफीने पकडले व एक पळून जाण्यात यशस्वी झाला त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणून खटला दाखल करून न्यायालयात हजर केले होते त्यांची नावे 1) शंकर भीमा काळे वय 25 राहणार बनसारोळा ता केज जिल्हा बीड 2) बाबा बापू काळे राहणार बनसारोळा ता केज जिल्हा बीड असे असून फरार झालेला आरोपी नामे 1) बाबू बन्सी काळे रा बनसारोळा ता केज असे आहे त्यावेळी त्यांना जामीन झाला आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो दिनांक 30/ 6 /2022 रोजी परत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोनपेठ येथे श्री व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्र व श्री तापडिया यांचे किराणा दुकान फोडून चोरी केल्याचे कबूल केले सध्या ते सोनपेठ येथे पोलीस कस्टडीत असून त्यांनी सोनपेठ सहित पाथरी, परभणी परळी या ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून सोनपेठ पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्ह्यातील तपास दरम्यान फरार आरोपी बाबू बन्सी काळे यांचा शोध घेत असून तपास पूर्ण झाल्यावर  त्यांचा ताबा परभणी व परळी पोलिसांना दिला जाणार आहे
         सदर कारवाई सपोनी बोरकर पोउपनी फड, ASI कुलकर्णी,HC वंजारे,PN लांडगे यांनी केली आहे.